जगज्जेता भारतीय संघ मायदेशात दाखल, रोहित शर्माने विश्वचषक उंचावताच जल्लोष
रविवारपासून 140 कोटी भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाटत पाहत होते अखेर तो क्षण आला आहे. टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर आज पहाटे भारतीय संघ दिल्लीत पोहोचला आहे. विश्वविजेत्या भारतीय संघाचे दिल्ली विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले.
आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहते 'रोहित-रोहित', 'कोहली-कोहली' असा जयघोष चाहते करत होते. खेळाडूंनीही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. रोहितने आपल्या हातात विश्वचषकाची ट्रॉफी घेत चाहत्यांसाठी उंचावली, यानंतर चाहत्यांनी मोठा जल्लोष केला.
भारताने टी ट्वेंटी विश्वचषकाच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. 20 जून रोजी झालेल्या T20 विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करून T20 विश्वचषक जिंकला आणि अशा प्रकारे भारतीय संघ दुसऱ्यांदा या फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनला आहे.

भारताचा 17 वर्षांचा दुष्काळ संपला
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 17 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे, याआधी या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाने 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर वर्ल्ड कप (50 षटकांचा) जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये विश्वचषक जिंकला.
भारताचे वाघ परतले, देशभरात जल्लोष
बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया तेथे अनेक दिवस अडकली होती. त्यामुळे मायदेशी परतण्यामध्ये भारतीय संघाला उशीर झाला आहे. मात्र अखेर जगज्जेता भारतीय संघ मायदेशी परतला आहे.
बीसीसीआयने सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर
भारतीय संघ परतल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे. भारतीय संघ दिल्लीतील आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये पोहोचली आहे, जिथे त्यांच्यासाठी एका मोठ्या सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलिब्रेशननंतर टीम इंडिया आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटेल आणि त्यानंतर संध्याकाळी मुंबईत विजयी परेडमध्ये सहभागी होईल.
#WATCH | Virat Kohli and Hardik Pandya at ITC Maurya Hotel in Delhi, after winning the #T20WorldCup2024 trophy. pic.twitter.com/o6yzbhcnzl
— ANI (@ANI) July 4, 2024
विराट कोहलीने जिंकल चाहत्यांच मन
भारतीय संघ विशेष विमानाने दिल्ली विमातळावर दाखल झाल्यानंतर खेळाडू एक-एक करुन बाहेर पडत होते. त्यावेळी विराट कोहली याने बसमध्ये शिरण्यापूर्वी भारतीय चाहत्यांना अभिवादन केले. दिल्ली एअरपोर्टवरील क्रिकेटप्रेमी मोठ्याने 'कोहली-कोहली' ओरडत होते. विराट कोहलीने त्यांच्याकडे पाहून अभिवादन केले. यावेळी विराट कोहलीच्या गळ्यात विश्वचषक स्पर्धेचे मेडल दिसत होते.
#WATCH | Virat Kohli along with Team India arrives at Delhi airport, after winning the #T20WorldCup2024 trophy.
— ANI (@ANI) July 4, 2024
India defeated South Africa by 7 runs on June 29, in Barbados. pic.twitter.com/wcbzMMvG7h
भारतीय संघाचे आजचे वेळापत्रक
विश्वविजेता भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार
दुपारी २ वाजता मुंबईकडे रवाना होणार
नरीमन पॉइंट ते वानखेडे मैदानापर्यंत विजयी परेड
संध्याकाळी ७ वाजता विजयी रक्कम वितरण सोहळा












Click it and Unblock the Notifications