Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'खो खो'मध्ये जगात भारतच बाप! वर्ल्डकप जिंकला, इतिहास रचला, पुरुष आणि महिला संघांनी विजेतेपद पटकावले

India win the kho kho world cup 2025 : खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारताने दबदबा निर्माण केला आहे. भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत विजय मिळवत विश्वचषक जिंकला आहे. यानंतर पुरुष गटातही भारताचे वर्चस्व दिसून आले.

भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडू जल्लोषात बुडाले. अंतिम फेरीत नेपाळमध्ये सामना झाला असून भारतीय पुरुष संघाचा या स्पर्धेत सुरुवातीपासूनच धमाका होता आणि अंतिम फेरीपर्यंत भारतीय संघ अपराजित राहिला.

India win the kho kho world cup 2025

भारताने अंतिम फेरीत नेपाळचा 54-36 अशा फरकाने पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले. अशा प्रकारे प्रतीक वायकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास रचला.

भारतीय आक्रमणासमोर नेपाळ नेस्तनाबूत

भारतीय आक्रमणासमोर नेपाळचा बचाव टिकू शकला नाही. हेच त्यांच्या पराभवाचे कारण होते. नेपाळच्या चार खेळाडूंना भारतीय बचावपटूंनी बाद केले. त्यामुळे भारताकडे आघाडी मिळत होती तर नेपाळवर दबाव वाढत होता. त्यानंतर भारताकडे आघाडी असल्याने नेपाळचा संघही दडपणाखाली आला.

महिला गटातही भारत आणि नेपाळ यांच्यात अंतिम सामना झाला. यामध्ये भारतीय महिलांनी 78-40 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. यासह स्पर्धेचे यशस्वी आयोजन समाप्त झाले.

भारतीय महिलांनी पहिल्या आणि तिसऱ्या वळणात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत नेपाळवर दडपण आणले. यानंतर नेपाळने जोरदार प्रयत्न केले मात्र आघाडी पार करता आली नाही. हा कार्यक्रम 13 जानेवारीला दिल्लीत सुरू झाला. पुरुष आणि महिला या दोन्ही गटातील विश्वचषक ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+