IND vs SA: संजू सॅमसनचे डर्बनमध्ये झंझावाती शतक, चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला
India vs South Africa, 1st T20 Sanju Samson: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दमदार शतक झळकलं आहे. संजू सॅमसन टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी सलग दोन शतके झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी संजू सॅमसनने हैदराबादमध्ये बांगलादेशविरुद्ध टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते.
दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संजू सॅमसनने एडन मार्करामचा हा निर्णय चुकीचा ठरवला. संजू सॅमसनने सुरुवातीच्या षटकापासूनच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्याने अवघ्या 47 चेंडूत शतक झळकावले आणि संघाला मजबूत धावसंख्या उभा करुन दिली.

युवा खेळाडू अभिषेक शर्माने पुन्हा निराश केले. तो सात धावा करून बाद झाला. भारताला दुसरा धक्का सूर्यकुमार यादवच्या रूपाने बसला. 17 चेंडूत 21 धावा करून तो बाद झाला. मात्र एका बाजूने संजू सॅमसन संघासाठी धावा जोडण्यात सातत्याने यशस्वी ठरला. केशव महाराजांनी टिळक वर्मा बाद केले. तो तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 33 धावा करून बाद झाला.
भारताने T20 मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाने 20 षटकांत आठ गडी गमावून 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 141 धावा करू शकला आणि 61 धावांनी सामना गमावला. यासह भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे.
भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, आवेश खान, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅन्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, नाकाबायोमझी पीटर.












Click it and Unblock the Notifications