Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs PAK: भारत आणि पाक यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यासाठी हा आहे सर्वोत्तम ड्रीम-11 संघ

India vs Pakistan Women, 2nd Match: महिला आशिया चषक 2024 मध्ये आज, 19 जुलै रोजी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. या स्पर्धेतील हा दुसरा सामना आहे. सर्व सामने डंबुलामध्ये खेळवले जाणार आहेत. हा सामना शुक्रवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी, दोन्ही संघांच्या ड्रीम-11 वर एक नजर टाकूया.

IND vs PAK

महिला आशिया चषक स्पर्धेच्या 9व्या सिरीजमध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार असून, यामध्ये दोन ग्रुप असणार आहेत. दोन प्रत्येक गटात चार संघ आहेत. भारतीय महिला संघ शुक्रवारी आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये मोठी लढत होणार असून येथील विजयामुळे स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी रंगत निश्चित होईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान हेड-टू-हेड रेकॉर्ड

भारत आणि पाकिस्तानची महिला टीम क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये प्रथमच T20 विश्वचषक (2009; टाँटन, इंग्लंड) च्या उद्घाटन सत्रादरम्यान आमनेसामने आली होते. भारताने हा सामना 15 धावांनी जिंकला. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 14 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत भारताने 11 सामन्यांमध्ये शानदार विजय नोंदवला आहे, तर पाकिस्तानच्या महिला संघाने केवळ 3 सामने जिंकले आहेत.

संभाव्य प्लेइंग-11 भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत: स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर, राधा यादव, अरुंधती रेड्डी , श्रींका पाटील.

पाकिस्तान : निदा दार (कर्णधार), मुनिबा अली (यष्टीरक्षक), सिद्रा अमीन, आलिया रियाझ, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोज, इरम जावेद, सादिया इक्बाल मैमा सोहेल, नशरा सुंधू.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+