India Vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामना 'फ्री'मध्ये कसं पाहता येणार, सापडलं खास जुगाड!
India vs Pakistan Asia Cup 2025 : आज आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सुपर फोर सामना रंगणार आहे. दुसरं म्हणजे, क्रिकेटप्रेमींसाठी हा क्षण एका उत्सवासारखा असतो.
टीम इंडियाने लीग टप्प्यात पाकिस्तानला पराभूत केले होते, त्यामुळे हा सामना अधिक रोमांचक होणार आहे. परंतु, तुम्हाला हा सामना पाहण्यासाठी अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही, कारण आता एका चॅनेलवर भारत पाकिस्तान सामना थेट लाईव्ह पाहता येणार आहे, तो देखील अगदी मोफत पाहता येणार आहे.

सामना कुठे आणि कसा पाहता येणार?
सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि सोनी लाईव्ह ॲपवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, पण यासाठी सबस्क्रिप्शन शुल्क भरावे लागते.
अनेक प्रेक्षकांना ही किंमत जास्त वाटू शकते. तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. हा रोमांचक सामना तुम्ही डीडी स्पोर्ट्स या सरकारी वाहिनीवर मोफत पाहू शकता.
डीडी स्पोर्ट्सवर भारत विरुद्ध पाकिस्तानसह भारतीय संघाचे आशिया कपमधील सर्व सामने विनाशुल्क दाखवले जात आहेत. त्यामुळे, पैसे खर्च न करता तुम्ही या ऐतिहासिक सामन्याचा थरार अनुभवू शकता.
हे ही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये आज पुन्हा भारत Vs पाकिस्तान सामना; कुठे व कसा पाहाल मॅच?
दोन्ही संघातील प्लेइंग-11
भारतीय संघ
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, जितेश शर्मा, रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती हे खेळाडू आहेत.
पाकिस्तानी संघ
सलमान आघाच्या नेतृत्वाखालील संघात सॅम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरिस, फखर जमान, खुशदिल शाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद, हुसेन तलत, फहीम अशरफ, हसन अली, मोहम्मद वसीम ज्युनियर, सलमान मिर्झा आणि सुफयान मुकीम यांचा समावेश आहे.
सामन्याची वेळ आणि ठिकाण
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा रोमांचक सामना आज रविवार, 21 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हा हाय-व्होल्टेज सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
भारतीय वेळेनुसार, रात्री 8:00 वाजता सामना सुरू होईल, तर टॉस संध्याकाळी 7:30 वाजता होईल. दुबईच्या या मैदानावर दोन्ही संघांचे फिरकीपटू उत्कृष्ट कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications