India vs Ireland: टीम इंडियाचा शानदार विजय, आयर्लंडवर 6 विकेट्सने मात, प्रतिका रावलची तुफानी खेळी
India vs Ireland highlights 1st odi: तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध 6 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय सलामीवीर प्रतिका रावल हिने 89 धावांची दमदार खेळी केली.
भारताकडून प्रिया मिश्राने दोन विकेट्स घेतल्या तर कर्णधार स्मृती मानधना, प्रतीक रावल आणि तेजल हसबनीस यांनी मौल्यवान खेळी करत दमदार विजय मिळवून दिला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघावर भारताचा हा 13 वा विजय आहे.

स्मृती मानधनाने 41 धावांची जलद खेळी
239 धावांचा पाठलाग करताना अनुभवी सलामीवीर स्मृती मानधनाने 41 धावा करत संघाला वेगवान सुरुवात दिली. तिची सलामीची जोडीदार प्रतीक रावलने सामना जिंकणारी अर्धशतक झळकावून भारतीय महिला संघाला आयर्लंड संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आहे.
गॅबी लुईसने 92 धावांची महत्त्वाची खेळी
आयर्लंडची सलामीवीर आणि कर्णधार गॅबी लुईसने 129 चेंडूत 15 चौकारांसह 92 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आयर्लंडच्या कर्णधाराव्यतिरिक्त मधल्या फळीतील फलंदाज लीह पॉलने 73 चेंडूत सात चौकारांसह 59 धावा केल्या. दोघांनीही शतकी भागीदारी केली. त्यामुळे संघ 50 षटकांत 238/7 असा सन्मानजनक धावसंख्या उभा केली. परंतू गॅबी लुईस आणि लीह पॉल या जोडीची दमदार खेळी संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.
भारत महिला संघ : स्मृती मानधना (कर्णधार), प्रतीक रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, सायली सतघरे, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, तितस साधू.
आयर्लंड महिला संघ: सारा फोर्ब्स, गॅबी लुईस (कर्णधार), उना रेमंड-होई, ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, कुल्टर रेली (यष्टीरक्षक), अर्लीन केली, जॉर्जिना डेम्पसी, फ्रेया सार्जंट, एमी मॅग्वायर.












Click it and Unblock the Notifications