Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये नेमकं चाललंय काय?, शुभमन-गंभीरमध्ये मतभेद, गिलचं कोणीच ऐकेना?

shubman gill vs gautam gambhir india dressing room rift 2025 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी संपण्यापूर्वीच भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील संभाव्य वादळाची चर्चा सुरू झाली आहे. संघाच्या प्लेइंग इलेव्हन निवडीवरून, विशेषतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांच्यातील कथित मतभेदांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी केलेल्या विधानांनी या चर्चांना अधिकच जोर आला आहे. जिथे त्यांनी संघाच्या निवडीमध्ये कर्णधाराच्या भूमिकेवर भर देत अप्रत्यक्षपणे गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.

IND vs ENG  Rift Between Gill and Gambhir

गावस्कर म्हणाले- कर्णधाराचे ऐकायला हवे!

सुनील गावस्कर यांनी संघाच्या निवडीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, कर्णधार आणि प्रशिक्षकाची सध्याची जोडी समजून घेणे त्यांना कठीण वाटत आहे. जेव्हा मी कर्णधार होतो, तेव्हा कोणताही माजी खेळाडू माझ्यासोबत नव्हता. आमच्या काळात विंग कमांडर दुर्राणी आणि राजसिंग डुंगरपूर होते," असे गावस्कर म्हणाले.

अंतिम निर्णय कर्णधाराचाच असला पाहिजे...

त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, संघ निवडीच्या बाबतीत अंतिम निर्णय कर्णधाराचाच असावा. जर शुभमन गिलला कुलदीप यादव किंवा शार्दुल ठाकूर यांपैकी एकाची निवड करायची असेल, तर ते तसेच व्हायला हवे होते. "लोक कर्णधाराबद्दल बोलतील, म्हणून निर्णयही त्याचाच असायला हवा होता," गावस्करांच्या या विधानांमधून हेच दर्शवते की, कुलदीप यादवला संघात न घेण्याचा निर्णय गौतम गंभीरमुळे झाला असावा, तर गिलला कुलदीपला संघात घ्यायचे होते.

गिल-गंभीर यांच्यात मतभेद

या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे ते वॉशिंग्टन सुंदरला उशिरा षटक देण्याच्या निर्णयावरून. सोशल मीडियासह अन्य काही मीडियांवर अशी चर्चा आहे की, इंग्लंडच्या डावात सुंदरला उशिरा षटक देण्यात आला कारण गिल कुलदीप यादवला संघात समाविष्ट न केल्याबद्दल नाराज होता.

गौतम गंभीरला सुंदरला लवकर षटक द्यावे अशी इच्छा होती, परंतु गिलने जाणूनबुजून ते उशिरा केले असे म्हटले जात आहे. दरम्यान, हे सर्व केवळ अंदाज आणि विश्लेषण आहेत. या अनिश्चिततेमुळे, भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये काहीतरी 'चालू' असल्याची शक्यता बळावली आहे.

अंशुल कंबोजच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह

शुभमन गिल आणि गौतम गंभीर यांच्यातील कथित मतभेदांबरोबरच, वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याला इतक्या लवकर संघात समाविष्ट करण्याची काय गरज होती, असा सवाल विचारला जात आहे, कारण इंग्लंडच्या फलंदाजांनी कंबोजला खूप धावा दिल्या. हे सर्व प्रश्न सूचित करतात की, पडद्यामागे काहीतरी चालू आहे, जे सध्या सार्वजनिकरित्या समोर येत नाहीये.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+