IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना कधी आणि कुठे होणार? घ्या जाणून
IND vs ENG 3rd ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी कटकमध्ये खेळलेला सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यात रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. या सामन्यात हिटमॅनची एक शानदार शतकी खेळी पाहायला मिळाली. या सामन्यात टीम इंडियाने 300 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य अगदी सहज गाठलं.
टीम इंडियाने फक्त सामनाच जिंकला नाही तर मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने तीनपैकी दोन सामने जिंकले. सध्या या मालिकेत एक सामना शिल्लक आहे, पण त्यामुळे भारतावर कोणताही फरक पडणार नाही. तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया आत्मविश्वासासह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मैदानात उतरेल. तिसरा एकदिवसीय सामनाही इंग्लंड संघासाठी सोपा असणार नाही. टीम इंडियाचा फॉर्म पाहता त्यांना येथे ही संघर्ष करावा लागणार आहे.

IND Vs ENG: भारत-इंग्लंड तिसरा एकदिवसीय सामना कधी होईल?
दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामन्यासाठी फक्त दोन दिवसांचा अंतर ठेवण्यात आलं आह. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी खेळला जाईल. म्हणजेच हा सामना 12 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. त्यामुळे येथील आठवणी टीम इंडियासाठी चांगल्या राहिलेल्या नाहीत.
आतापर्यंतचा रेकॉर्ड कसा आहे?
अहमदाबादचे सरदार पटेल स्टेडियम त्याच्या नूतनीकरणानंतर नरेंद्र मोदी स्टेडियम बनलं आहे. टीम इंडियाने या स्टेडियममध्ये एकूण 20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 11 सामने जिंकले आहेत आणि 9 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.












Click it and Unblock the Notifications