Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs BAN : दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिय कानपूरमध्ये दाखल, पंत-कोहलीची हटके स्टाईल! व्हिडिओ व्हायरल

IND vs BAN : भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कानपूरला पोहोचला आहे. दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ कानपूरच्या मैदानावर सराव करणार आहे. 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत चालणारा हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाईल.

सर्वत्र क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या या क्रीडा स्पर्धेची महत्त्वाची सुरुवात मंगळवारी खेळाडूंचे शहरात आगमन झाले.पंत-कोहली हे विमानतळावरून हॉटेलच्या दिशेने जाताना हटके अंदाजात दिसले. कर्णधार रोहित शर्माशिवाय विराट कोहली, ऋषभ पंत आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही संघासोबत दिसले. यावेळी ऋषभ पंत खूपच वेगळ्या अंदाजात दिसला.

IND vs BAN second test match

पहिल्या कसोटीत शतक झळकावून ऋषभ पंतने आपला फॉर्म परत मिळवला आहे. ऋषभ पंत कानपूर कसोटीतही धावा करण्याचा प्रयत्न करेल. भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याची तयारी जोरात सुरू आहे. ही मालिका दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाची आहे.

मंगळवारी आगमन झाल्यानंतर भारतीय संघ आणि बांगलादेशच्या खेळाडूंना एका विशेष बसमधून सिव्हिल लाइन्स येथील हॉटेल लँडमार्कमध्ये नेण्यात आले. हॉटेलमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले, पारंपारिक शंख आणि रुद्राक्षाच्या माळा त्यांना भेट दिल्याचे बोलले जात आहे.

सामन्यापूर्वी दोन्ही संघ सराव करणार

25 सप्टेंबरला उभय संघाचे सराव सत्र निश्चित केले आहे. पाहुण्या बांगलादेश संघाने ग्रीन पार्क स्टेडियम सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारापर्यंत सरावासाठी वेळ निश्चित केली आहे. त्यानंतर यजमान टीम इंडियाने दुपारी दीड ते साडेचार या वेळेत सराव करणार आहे. सराव सत्रांचा क्रम दुसऱ्या दिवशीही सुरू राहील यामध्ये टीम इंडिया सकाळी लवकर सराव सुरू करेल, त्यानंतर दुपारी बांग्लादेश सराव करणार आहे.

कानपूर कसोटी या गोष्टामुळे खास होणार

भारत आणि बांगलादेश यांच्यातील ग्रीन पार्क स्टेडियमवर होणारा हा कसोटी सामना क्रिकेट केवळ एकच इव्हेंट नाही. त्याऐवजी, हा खेळांचा उत्सव आहे, जो दोन शेजारी देशांमधील एकता आणि स्पर्धात्मक भावना दर्शवणारा आहे. भव्य स्वागतापासून ते स्टेडियमच्या सौंदर्यासाठी खास डिझाइन केलेल्या सराव सत्रापर्यंतच्या व्यापक तयारीसह, कानपूर क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+