Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत-ऑस्ट्रेलिया पर्थ कसोटी; पहिल्या दिवसाच्या डावात काय घडलं, बुमराहने किती घेतले बळी, वाचा सर्वच

India vs Australia LIVE Cricket Score, 1st Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी भारत चांगल्या स्थितीत पोहोचला आहे. भारतीय संघ 83 धावांनी पुढे असून ऑस्ट्रेलियाच्या फक्त 3 विकेट शिल्लक आहेत.

ऑप्टस स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही आणि संघ दीडशे धावांवर सर्वबाद झाला. जोश हेझलवूडने 4 विकेट घेतल्या.

दुसरीकडे भारताने गोलंदाजीमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाने 59 धावांत 7 विकेट गमावल्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाच्या 67 धावा झाल्या होत्या, ॲलेक्स कॅरीने 19 आणि मिचेल स्टार्क 6 धावा करून नाबाद परतले. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या.

India Vs Australia Test

नितीश रेड्डीने किती धावा काढल्या

भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. 73 धावा केल्यानंतर संघाने 6 विकेट गमावल्या होत्या. यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांना खातेही उघडता आले नाही. विराट कोहली 5 धावा करून, ध्रुव जुरेल 11 धावा करून आणि वॉशिंग्टन सुंदर 4 धावा करून बाद झाला.

नवोदित नितीश रेड्डी याने 41 धावा (59 चेंडू) आणि यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने 78 चेंडूत 37 धावा केल्या. दोघांमध्ये 7व्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी झाली. तर केएल राहुलने 74 चेंडूत 26 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने 4 बळी घेतले. पॅट कमिन्स, मिचेल मार्श आणि मिचेल स्टार्कने 2-2 विकेट घेतल्या.

बुमराहने 4 विकेट घेतल्या

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवशी पहिल्या डावात ट्रॅव्हिस हेडने 11, नॅथन मॅकस्विनीने 10, उस्मान ख्वाजाने 8, मिचेल मार्शने 6, पॅट कमिन्सने 3 आणि मार्नस लॅबुशेनने 2 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथला खातेही उघडता आले नाही. भारताकडून आतापर्यंत जसप्रीत बुमराहने 4 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या आहेत. हर्षित राणाला 1 बळी मिळाला.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत: जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन मॅकस्वीनी, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+