Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारत की दक्षिण आफ्रिका.. कालचा अंडर-19 मॅच कुणी जिंकला? वैभव सूर्यवंशीचे पुन्हा वादळी शतक

India u19 vs south africa u19 3rd odi match result : भारत आणि दक्षिण आफ्रिका अंडर-१९ (U19) दरम्यान ७ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने ही मालिका ३-० ने खिशात घालत दक्षिण आफ्रिकेचा सफशेल पराभव केला आहे.

भारतीय अंडर-१९ संघाने ७ जानेवारी रोजी रात्री उशीरापर्यंत झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर २३३ धावांनी विजय मिळवला. कर्णधार वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज यांच्या झंझावाती शतकांच्या जोरावर भारताने ३९३ धावांचा डोंगर उभा केला होता, ज्यासमोर यजमानांचा पूर्णपणे पालापाचोळा झाला.

India u19 vs south africa u19 3rd odi match result

सूर्यवंशी-जॉर्जची 'रेकॉर्डब्रेक' भागीदारी

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय सलामीवीरांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. कर्णधार वैभव सूर्यवंशीने अवघ्या ७४ चेंडूत १२७ धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामध्ये १० उत्तुंग षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता. त्याला योग्य साथ देत एरॉन जॉर्जने ११८ धावांची संयमी आणि आक्रमक खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २२७ धावांची भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया रचला.
दक्षिण आफ्रिकेची शरणागती

३९४ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत खराब झाली. किशन कुमार सिंगच्या धारदार गोलंदाजीमुळे यजमान संघाने अवघ्या १५ धावांत ४ विकेट गमावले होते. दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही आणि संपूर्ण संघ ३५ षटकांत १६० धावांवर गारद झाला.

भारतीय गोलंदाजी: किशन कुमार सिंगने भेदक मारा करत ३ बळी घेतले, तर मोहम्मद एनानने २ विकेट्स घेतल्या. कर्णधार वैभव सूर्यवंशीने फलंदाजीनंतर गोलंदाजीमध्येही १ बळी घेत अष्टपैलू कामगिरी केली.

विजेता भारत

या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली आहे. वैभव सूर्यवंशीला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी 'सामनावीर' आणि संपूर्ण मालिकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 'मालिकावीर' पुरस्काराने गौरवण्यात आले. अंडर-१९ विश्वचषकापूर्वी मिळवलेला हा विजय भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावणारा ठरेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+