Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारतीय हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी: चीनचा धुव्वा उडवून आशिया कपच्या फायनलमध्ये एंट्री!

india hockey team asia cup 2025 : हॉकी आशिया कप 2025 च्या सुपर फोर सामन्यात भारतीय हॉकी संघाने दमदार खेळ दाखवत चीनचा 7-0 असा धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले.

india hockey team asia cup 2025

पहिल्या हाफमध्ये भारताचा दबदबा

सामन्याच्या पहिल्या चार मिनिटांतच भारताने आपले इरादे स्पष्ट केले. शिलानंदने भारतासाठी पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर सातव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत दिलप्रीतने अप्रतिम कौशल्य दाखवत चिनी खेळाडूंना चकवून दुसरा गोल केला. यामुळे भारताची आघाडी 2-0 झाली. यानंतर दोन्ही संघांना पहिल्या क्वार्टरमध्ये कोणताही गोल करता आला नाही.

दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय खेळाडूंची आक्रमकता कायम राहिली. 18 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर मंदीप सिंहने गोल करत भारताची आघाडी 3-0 पर्यंत वाढवली. हाफ टाइमपर्यंत हाच स्कोअर कायम राहिला आणि भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

दुसऱ्या हाफमध्ये गोलचा पाऊस अन् विजयाची नोंद

दुसऱ्या हाफमध्येही भारतीय खेळाडूंनी चीनला कोणतीही संधी दिली नाही. 37 व्या मिनिटाला राजकुमारने बॉक्समध्ये टाकलेल्या पासवर सुखजीतने भारताचा चौथा गोल केला.

त्यानंतर 39 व्या मिनिटाला भारताचा पाचवा गोल झाला. सामन्याच्या शेवटी अभिषेकने 46 व्या आणि 50 व्या मिनिटाला असे दोन सलग गोल करून चीनच्या आशा पूर्णपणे संपुष्टात आणल्या.

अशा प्रकारे भारतीय संघाने 7-0 अशा मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आणि हॉकी आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना कोरियाशी होणार आहे, जो एक अत्यंत रोमांचक आणि चुरशीचा सामना असेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+