Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

1983 पासून आजवर भारताने 'हे'आंतरराष्ट्रीय चषक जिंकले! आज काय होणार?

List of ICC Trophies Won by India : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका टी - 20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज खेळला जात आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला 11 वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. भारतीय संघाने 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 मध्ये शेवटची ICC ट्रॉफी जिंकली होती.

Indian Team

2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरला होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

2023 मध्ये संधी सुटलेल्या संधी:

गेल्या 2023 या वर्षी भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय ट्रॉफी जिंकण्याच्या दोन संधी होत्या. मात्र दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना जिंकण्यात यश मिळू शकले नाही. यानंतर 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पहिले मोठे यश 1983 मध्ये मिळाले. पहिला विजय 1983 मध्ये झाला. भारतीय संघाने आतापर्यंत एकूण पाच आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. 1983 मध्ये, भारताने प्रथमच एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. वास्तविक, 1983 साली भारतीय संघ दुबळा समजला जात होता. हा संघ एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावू शकेल असे भारतीय संघाबाबत कोणीही भाकित केले नव्हते. पण कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला आणि ट्रॉफीवर कब्जा केला.

2007 मध्ये पाक विरुद्ध जिंकला टी 20 विश्वचषक:

2007 साल भारतीयांच्या विशेष स्मरणात राहील. कारण महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 साली भारतीय संघाने T-20 विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा करून इतिहास रचला. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव करून टी- 20 विश्वचषक जिंकण्यात भारतीय संघाला यश आले.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीनदा आयसीसी ट्रॉफीवर कब्जा केला आहे. 2007 T20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी या तीनही प्रसंगी महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचे नेतृत्व करत होता.

दरम्यान साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळताना भारत आज या इतिहासाची पुनरावृत्ती करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+