IND Vs SA Women's World CuP : इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज! आज आफ्रिकेविरुद्ध फायनल; कोण जिंकणार?
IND vs SA Women's World Cup 2025 Final : आजचा दिवस भारतीय महिला क्रिकेटसाठी इतिहासाच्या पुस्तकात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाणार आहे! आज, रविवार, २ नोव्हेंबर २०२५, नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीचे मैदान एका महाअंतिम सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. कारण, भारतीय महिला संघ आपल्या पहिल्या-वहिल्या विश्वचषक विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे!

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची धडाकेबाज खेळी, विशेषतः सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला धूळ चारून ३३९ धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची अविश्वसनीय कामगिरी, संपूर्ण देशाला एक नवी आशा देऊन गेली आहे. आज भारतासमोर आव्हान आहे दक्षिण आफ्रिकेचे, जो संघ स्वतः पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या व्यासपीठावर ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडचा दबदबा पहिल्यांदाच नाही.
आजचा सामना केवळ दोन संघांमध्ये नाही, तर दोन महत्त्वाकांक्षी स्वप्नांमध्ये आहे! कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा घेऊन उतरलेला आपला संघ, मायदेशातील चाहत्यांच्या गर्दीत इतिहास घडवण्यास आणि विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज आहे. हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी एका जबरदस्त, रोमांचक नाट्यमय लढतीची मेजवानी ठरणार आहे!

- सामन्याची तारीख रविवार, २ नोव्हेंबर २०२५
- मैदान डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई
- टॉसची वेळ दुपारी २:३० वाजता (IST)
- सामन्याची वेळ दुपारी ३:०० वाजता (IST)
भारत -आफ्रिका कोणाचे पारडे जड?
महिला एकदिवसीय क्रिकेटमधील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आकडेवारी पाहिल्यास भारतीय संघाचे पारडे स्पष्टपणे जड आहे. भारत आणन दक्षिण आफ्रिका संघात एकूण ३४ सामने झाले त्यात भारताने २० सामने जिंकले असून ११ सामने आफ्रिकेने जिंकले आहेत. यातील ११ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. मात्र, या विश्वचषकाच्या साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभूत केले होते, त्यामुळे अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होणार हे निश्चित
सेमीफायनलमधील दोन्ही संघांची कामगिरी
भारत: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३३९ धावांचे विक्रमी आव्हान जेमिमा रॉड्रिग्ज (नाबाद १२७) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (८९) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर यशस्वीरित्या पार करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दक्षिण आफ्रिका: कर्णधार लॉरा वोल्वाड्टच्या (१६९) नेतृत्वाखालील जबरदस्त कामगिरीमुळे इंग्लंडला १२५ धावांनी हरवून त्यांनी पहिल्यांदाच फायनलमध्ये जागा निश्चित केली.












Click it and Unblock the Notifications