IND vs SA 1st T20: आज भारत - आफ्रिका पहिला टी20 सामना, भारताला सतावणारा 'मनहूस' रेकॉर्ड तुटणार का?
Ind vs sa 1st t20 : कसोटीतील निराशा धुऊन काढत भारताने नुकतीच वनडे मालिका खिशात टाकली. पण आता खरी परीक्षा आहे टी-२० क्रिकेटची! कर्णधार सूर्यकुमार यादव (SKY) च्या युवा ब्रिगेडसमोर आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. पाच सामन्यांच्या या थरारक मालिकेतील पहिली लढत कटकच्या बाराबती स्टेडियमवर आज सायंकाळी सात वाजता होणार आहे.
आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकणं टीम इंडियासाठी सोपं नाहीये, कारण याच मैदानावर भारताचा भूतकाळ हा विजयाऐवजी पराभवाच्या साक्ष देत उभा आहे! गोलंदाजांना मदत करणाऱ्या या रहस्यमय पिचवर भारत 'आफ्रिकेच्या विजयाची घौडदौड रोखणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे डोळे लागले आहेत.

जुना हिशेब चुकता करण्याची वेळ!
भारतीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघ कटकच्या बाराबती स्टेडियमवर पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. एकीकडे भारताने नुकताच वनडे मालिका विजय मिळवला आहे, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-२० मध्ये आपली ताकद सिद्ध करण्यासाठी आतुर आहे.
बाराबती, दक्षिण आफ्रिकेचा गड!
टीम इंडियासाठी सर्वात मोठी चिंता ही या मैदानाची आहे. बाराबती स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत दोन टी-२० सामने झाले आहेत आणि विशेष म्हणजे दोन्ही वेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे २०१५ आणि २०२२ मध्ये आफ्रिकी संघाने यशस्वीरित्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताला हरवले होते.
पिच रिपोर्ट: गोलंदाजांचा बोलबाला
या मैदानावर मोठा स्कोअर करणे नेहमीच आव्हान राहिले आहे. पिचची अवस्था पाहता, फिरकीपटू (Spinners) आणि असामान्य उसळीचा फायदा घेणारे वेगवान गोलंदाज (Pace Bowlers) आज निर्णायक भूमिका बजावतील. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी पसंत करेल, कारण या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजयाचा रेकॉर्ड उत्तम आहे.
'सूर्यकुमारयादव'च्या युवा टीमची रणनीती
सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, तिलक वर्मा आणि अर्शदीप सिंग यांसारख्या युवा खेळाडूंसह जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्यासारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ आज जुना पराभवाचा हिशेब चुकता करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
संभाव्य Playig XI मध्ये मोठे बदल
- आजच्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघात काही महत्त्वाचे खेळाडू दिसत आहेत. भारतासाठी संजू सॅमसन यष्टिरक्षणाची भूमिका सांभाळताना दिसू शकतो, तर फिरकीची धुरा वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल सांभाळतील.
- दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार एडन मार्करामसह क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर हे अनुभवी फलंदाज आणि केशव महाराज, एन्रिक नॉर्टजे हे गोलंदाज गेम चेंजर ठरू शकतात.
- आजच्या सामन्यात भारत हा मनहूस रेकॉर्ड तोडून टी-२० मालिकेत विजयी सुरुवात करणार की, दक्षिण आफ्रिका आपले वर्चस्व कायम राखणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे!
संभाव्य प्लेइंग 11
भारत: सूर्यकुमार यादव (कप्तान), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू शामन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, आणि वरुणवर्ती चक्र.
दक्षिण आफ्रिका: एडेन मार्कराम (कप्तान), रीजा हेन्ड्रिक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, डेविड मिलर, मार्को जानसेन, कॉर्बिन बॉश, डोनोवन फरेरा, केशव महाराज, एनरिकनॉर्टजे.












Click it and Unblock the Notifications