Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs PAK: भारत vs पाकिस्तान पुन्हा मॅच! सलग चौथ्या 'सुपर संडे'ची प्रतीक्षा 'या' दिवशी रंगणार सामना

IND vs PAK : एशिया कपमध्ये पुरुष संघाने पाकिस्तानला हरवून ऐतिहासिक हॅटट्रिक साजरी केल्यानंतर, क्रिकेटचा तो थरार आता थेट ICC महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये पोहोचला आहे! एकामागोमाग तीन 'सुपर संडे' पुरुषांच्या नावावर केल्यानंतर, आता 5 ऑक्टोबर (रविवार) रोजी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. यावेळी 'जंग का मैदान' असेल श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो आणि जबाबदारी असेल हरमनप्रीत कौरच्या 'विमेन्स इन ब्लू'च्या खांद्यावर.

Ind vs pak women world cup colombo 5 oct 2025

क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात मोठे वैमनस्य पुन्हा एकदा जगासमोर येणार आहे, तेही एका अशा विक्रमासह-जिथे भारतीय महिलांचा पाकिस्तानविरुद्ध वनडेत 100% (11-0) विजयाचा रेकॉर्ड आहे! आता हा विक्रम 12-0 करण्याची संधी आहे! एशिया कप 2025 च्या फायनलमध्ये दुबईत पुरुष संघाने पाकिस्तानला धूळ चारून ऐतिहासिक किताब जिंकला. या विजयाच्या जल्लोषात असतानाच, क्रिकेटप्रेमींसाठी एक आणखी मोठी पर्वणी तयार झाली आहे. पुरुष संघाच्या सलग तीन 'सुपर संडे'च्या विजयानंतर, आता भारतीय महिला संघ त्यांच्या 'कट्टर-प्रतिस्पर्धी' पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरणार आहे.

कधी होणार महासंग्राम..

येत्या 5 ऑक्टोबर 2025 (रविवार) रोजी सलग चौथ्या 'सुपर संडे'ला हे दोन्ही संघ भिडतील. यावेळी ICC महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये ही 'महाभिड़ंत' रंगणार आहे. हा महामुकाबला 5 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3:00 वाजता (IST) सुरू होईल.

बदललं 'जंग का मैदान': कोलंबो ठरलं तटस्थ ठिकाण

यावेळी भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज मुकाबला श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत महिला वर्ल्ड कपचा सह-मेजबान असूनही हा सामना तटस्थ ठिकाणी (Neutral Venue) खेळवला जात आहे. भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डांमधील (BCCI आणि PCB) करारानुसार, दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत आणि बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांचे सामने तटस्थ स्थळी आयोजित केले जातात. याच कारणामुळे पाकिस्तानचा संघ त्यांचे वर्ल्ड कपमधील सर्व सामने श्रीलंकेत खेळत आहे.

वनडेत भारताचा रेकॉर्ड 100 टक्के

हा सामना भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खास आहे, कारण हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ पाकिस्तानविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये 100% विजयाच्या विक्रमासह मैदानात उतरेल. दोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत झालेल्या 11 ODI सामन्यांमध्ये भारताने सर्व 11 वेळा विजय मिळवला आहे. महिला क्रिकेटमध्येही भारतीय संघाचे वर्चस्व सिद्ध करणारा हा रेकॉर्ड 12-0 करण्याची संधी 'विमेन्स इन ब्लू'ला मिळणार आहे. पुरुष संघाच्या विजयाची लय कायम राखत, महिला संघही देशाला पुन्हा एकदा अभिमानास्पद क्षण देण्यास उत्सुक आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+