रोहित शर्मा छा गये..! सचिन तेंडुलकरचा रेकाँर्ड तोडून केला एक अनोखा विक्रम; ठरला टाँप-५ फलंदाज
भारतीय कर्णधार रोहित शर्माने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना एक नवी रेकाँर्ड आपल्या नावावर केला. सलामीवीर फलंदाज म्हणून एकदिवसीय सामन्यात ९,००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो सहावा फलंदाज बनला. ३७ वर्षीय रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील पहिल्या धावेने हा टप्पा गाठला. एवढेच नाही तर सलामीवीर म्हणून रोहित शर्माने सचिन तेंडुलकर (१५३१०), सनथ जयसूर्या (१२७४०), ख्रिस गेल (१०१७९), अॅडम गिलख्रिस्ट (९२००) आणि सौरव गांगुली (९१४६) यांच्यासह या खास क्लबमध्ये सामील झाला आहे.

रोहित शर्माचा विक्रम
रविवारी चॅम्पियन ट्राँफीत पाकिस्तानविरुद्ध खेळताना रोहित शर्माने १५ चेंडूत २० धावा केल्या. त्यात त्याने तीन चौकार व एक षटकार लगावला. आपल्या छोट्याशा खेळीत रोहितने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. सलामीवीर म्हणून सर्वात कमी सामन्यांत ९००० एकदिवसीय धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो जाऊन बसला. फक्त १८१ एकदिवसीय सामन्यांत त्याने ही कामगिरी केली.
तेंडुलकरला टाकले मागे
रोहित शर्मा फक्त १८१ एकदिवसीय सामन्यांत सर्वात जलद ९००० धावा करणारा तो सलामीवीर फलंदाज ठरला. यापूर्वी सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वात जलद ९००० धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. ज्याने १९७ डावांमध्ये हा पराक्रम केला होता. याआधी, भारतीय सलामीवीर रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११००० धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीनंतर हा टप्पा गाठणारा तो दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला.
९००० धावा पूर्ण करणारे सलामीवीर
१) सचिन तेंडुलकर - ३४० डावांमध्ये १५३१० धावा
२) सनथ जयसूर्या - ३८३ डावांमध्ये १२७४० धावा
३) ख्रिस गेल - २७४ डावांमध्ये १०१७९ धावा
४) अॅडम गिलख्रिस्ट - २५९ डावांमध्ये ९२०० धावा
५) सौरव गांगुली - २३६ डावांमध्ये ९१४६ धावा
६) रोहित शर्मा - १८१ डावांमध्ये ९००० धावा**
फास्टेस्ट ९००० धावा करणारे सलामीवीर
१) १८१ डाव - रोहित शर्मा
२) १९७ डाव - सचिन तेंडुलकर
३) २३१ डाव - सौरव गांगुली
४) २४६ डाव - ख्रिस गेल
५) २५३ डाव - अॅडम गिलख्रिस्ट
६) २६८ डाव - सनथ जयसूर्या












Click it and Unblock the Notifications