तिकडे भारत जिंकला! इकडे पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानला झोंबणारे 'ट्वीट' वाचा पीएम मोदी काय म्हणाले?
IND VS PAK PM Modi's Tweet :आशिया कपमधील अंतीम सामन्यात भारताने पाकड्यांना पराभूत केले. हा विजय केवळ भारतीयांसाठी फक्त सेलिब्रेशनच नाही तर त्याहून खूप काही आहे, हे कालपासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटवरुन स्पष्ट होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा या स्पर्धेतील तिसरा सामना होता आणि पाकला तिन्ही सामन्यात भारताने पाणी पाजले.

आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईतील स्टेडीयममध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघासाठी सुरुवातीची १० षटकं फारच कठीण होती. या १० षटकात पाकीस्तानच्या सलामीच्या फलंदाजांनी एकही गडी बाद करत ८७ धावा केल्या, पण भारतीय संघाने धैर्य सोडले नाही आणि अवघ्या ३३ धावात ९ पाक फलंदांना घरी पाठवत सिंदूर ऑपरेशनसारखे यश खेचून आणले.
१४५ धावांत सर्व पाकड्यांचा संघ भारताने तंबुत परतवला आणि तिलक वर्माच्या संयमी खेळीने तसेच शिवम दुबेच्या चतुराईच्या फलंदाजीने भारताने ५ गडी राखत पाकवर दणदणीत विजय मिळवत आशिया कपची विजयश्री खेचून आणली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन
भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप जिंकल्यानंतर देशात सेलीब्रेशन सुरु झाले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मोठा आनंद झाला. त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आणि सोशल मीडियावर एक खास तीन ओळीची मोजक्या शब्दात पोस्ट केली, जी पाकड्यांना त्यांची जागा दाखवणारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट
भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मिडियावरील एक्स या अकाऊंटवर एक पोस्ट केली. रात्री बाराच्या ठोक्याला भारताने विजय मिळवला आणि बरोबर १२ वाजून २० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकला झोंबणारी पोस्ट केली. खेळाच्या मैदानातील ऑपरेशन सिंदूर यशस्वी असे नमूद करत पाकला त्यांची जागा आणि 'हैसीयत' त्यांनी दाखवून दिली. पंतप्रधान मोदींची जशाला तशी पोस्ट खाली देत आहोत.
"ऑपरेशनसिंदूर खेळाच्या मैदानावर. निकाल एकच आहे - भारत जिंकला! आपल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन."
बुमराहने घडवली रौफला अद्दल
दुबई येथे सुरू असलेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील केवळ मैदानावरच नव्हे, तर 'हावभावांच्या' युद्धातही भारताने वरचढ ठरत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी खेळाडू हरिस रौफला क्लीन बोल्ड करून, त्याला त्याच्याच 'विमान सेलिब्रेशन'ने उत्तर दिले आणि त्याचा अहंकार खाली आणला.












Click it and Unblock the Notifications