IND vs PAK: पाकिस्तानचे स्वप्न पुन्हा एकदा भंगणार! सामन्यापूर्वीच चाहते म्हणाले- आमचा पराभव निश्चित
IND vs PAK Match Prediction: भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहोत. या सामन्यात पाकिस्तानवर अधिक दडपण आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामनात पाकिस्तानचा न्युझीलंडकडून पराभव झाला आहे. आता उद्या भारताकडून पराभव झाला तर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता खूपच कमी होईल.
दुसरीकडे, भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला पराभूत केलं आहे. या सामन्यात उपकर्णधार शुभमन गिलने शतक झळकावलं आहे. तर कर्णधार रोहित शर्मा देखील फॉर्मामध्ये परतला आहे.

भारतीय संघ दुसरा विजय नोंदवणार ?
भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात बांग्लादेश पराभूत करुन विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे टीम इंडिया अजून आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय संघ दुबईमध्ये विजय नोंदवण्याचा इराद्याने मैदानात उतरेल. पाकिस्तान संघाला स्पर्धेत जिंवत राहण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे.
पाकिस्तानी चाहत्यांनी सामन्यापुर्वीच पराभव स्वीकारला
पाकिस्तानी चाहत्यांनी सामन्यापूर्वीच भारताकडून पराभव स्वीकारला आहे. जेव्हा एका युट्यूब चॅनेलवर पाकिस्तानी चाहत्यांना विचारण्यात आले की, पाकिस्तान भारताला हरवू शकेल का? या प्रश्नाच्या उत्तरात बहुतेक लोकांनी सांगितले की पाकिस्तानी संघ भारतीय संघापेक्षा खूपच कमकुवत आहे. त्यामुळे पाकिस्तान भारताविरुद्धचा सामना जिंकू शकणार नाही.
दोन्ही संघांमध्ये मोठा फरक
क्रिकेट चाहत्यांच्या मते, भारताकडे रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिलसारखे दिग्गज खेळाडू आहेत. भारताला जिंकवण्यासाठी हे एकटे खेळाडू पुरेसे आहेत. तर पाकिस्तानकडे असा कोणताही खेळाडू नाही, ज्याच्यावर विश्वास दाखवता येईल. काही चाहत्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या पाकिस्तानी संघावरही प्रश्न उपस्थित केले. चाहत्यांच्या मते, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पर्धेसाठी योग्य खेळाडूंची निवड केलेली नाही.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी उपयुक्त मानली जाते. पाकिस्तानचा गोलंदाजी विभाग बराच संतुलित आहे, त्यामुळे काही चाहत्यांनी पाकिस्तानच्या विजयाची आशा व्यक्त केली आहे.
Champions Trophy 2025: भारत-पाक सामना कुठे पहायचा ?
क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स आणि नेटवर्क 18 वाहिन्यांवर दुपारी 2:00 वाजता (IST) सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. ऑनलाइन स्ट्रीमिंग पसंत करणाऱ्यांसाठी JioHotstar अॅप आणि वेबसाइट एकाच वेळी लाईव्ह कव्हरेज प्रदान करतील. तुम्ही जिओ हॉटस्टारवर भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग मोफत पाहू शकता.
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.












Click it and Unblock the Notifications