Ind vs Pak : सऊद शकील, रिजवानची शतकी भागिदारी! पाकिस्तानसाठी बनले तारणहार! हे खेळाडू कोण? वाचा
Ind vs Pak Live Updates : भारत पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यात सामना सुरु असून एकवेळ पाकिस्तानची स्थिती बेहाल झाली होती, 25 षटकात शंभर धावाही झाल्या नव्हत्या. पण तारणहार म्हणून मोहम्मद रिजवान आणि सऊद शकील हे धावून आले. दोघांच्या भागिदारीने पाकिस्तानला थोडा फार दिलासा मिळाला आहे.
एकवेळ भारताचे पारडे या सामन्यात वरचढ वाटत असतानाच पाकिस्तानतर्फे निकराला लढा देत रिजवान आणि शकीलने पाकिस्तानला तारले विकेट तर वाचवलीच पण धावसंख्याही वाढवली आहे, या दोघांच्या भागिदारीने संघाची मॅचमध्ये पुन्हा पुनरागमन झाले आहे. चला तर सऊद रिजवान आणि मोहम्मद शकील कोण आहेत? जाणून घेऊया.

मोहम्मद रिजवान आणि सऊद शकील यांनी पाकिस्तान संघाला तारले एवढेच नाही तर दोघांनी शतकी भागिदारी करत संघाला संकटातून बाहेरही काढले. सऊद शकील 62 धावांवर खेळत असून मोहम्मद रिजवान हा अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर 46 धावांवर क्लिन बोल्ड झाला आहे.
Saud Shakeel सऊद शकीलबद्दल जाणून घेऊया
- सऊद शकील हा पाकिस्तानी खेळाडू आहे, त्याचा जन्म 10 मे 1995 रोजी कराची, सिंध येथे झाला.
- त्याने 26 ऑक्टोबर 2015 रोजी 2015-16 क्विद-ए-आझम ट्रॉफीमध्ये पदार्पण केले.
- नोव्हेंबर 2017 मध्ये, त्याची क्वेटा Gladiers 2017 मध्ये खेळण्यासाठी निवड झाली.
- तो 2017-18 कायद-ए-आझम ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, त्याने 488 धावा केल्या होत्या. पाच सामन्यांमध्ये 414 धावांसह आघाडीवर होता.
- डिसेंबर 2018 मध्ये, त्याला पाकिस्तानच्या संघात 2018 एसीसी उदयोन्मुख संघ एशिया चषक स्पर्धेत संधी मिळाली.
- नोव्हेंबर 2019 मध्ये, बांगलादेशातील 2019 ACC इमर्जिंग टीम्स आशिया चषकासाठी त्याला पाकिस्तान संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.
- जानेवारी 2021 मध्ये, त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले.
Mohammad Rizwan मोहम्मद रिजवानबद्दल जाणून घेऊया.
- मोहम्मद रिजवान हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे जो पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो.
- सध्या तो चॅम्पियन ट्राॅफीत भारताविरुद्ध त्याने चांगली बॅटींग केली आणि संघाला संकटातून सुस्थितीत नेण्यात हातभार लावला.
- मोहम्मद रिझवान पाकिस्तानकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळतो. त्याचा जन्म 1 जून 1992 ला पेशावर परिसरात झाला.
- 32 वर्षीय खेळाडू उजव्या हाताने फलंदाजी करतो. 25 नोव्हेंबर 2016 रोजी त्याने न्युझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
- वनडे सामन्यात त्याने बांगलादेशविरुद्ध 2015 साली पदार्पण केले होते. तर 24 एप्रिल 2015 रोजी त्याने T20 सामन्यात पदार्पण केले.
- रिजवानने टेस्टमध्ये एक अर्धशतक, वनडेत दोन शतक लगावले आहेत.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications