Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs PAK :T20 womens world cup मध्ये पाकिस्तानसोबत आज भिडणार भारताच्या रणरागिनी! येथे मॅच Live बघा

IND vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तानसंघाचा हाॅकीचा सामना असो की, महिला अथवा पुरुष संघाचा विजय भारताचाच व्हावा अशी सर्वांचीच इच्छा असते. सध्या तर महिला टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा सुरु आहे आणि या सामन्यात भारताने विजयी व्हावे ही तमाम भारतीय क्रीडा रसिकांचीच इच्छा..त्यामुळे आजही भारत पाकिस्तानला नमवणार का हा प्रश्न आणि चिंताही क्रीकेट चाहत्यांच्या मनात आहे.

T20 महिला विश्वकप स्पर्धेत पाकिस्तानचा सामना आज भारतीय महिला क्रिकेटपटूंचा संघ करणार आहे. या दोन देशांत रोमांचक सामना अपेक्षित आहे. भारतीय रणरागिनी आज 6 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी संघाशी भिडणार आहेत.यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.

IND vs PAK T20 womens world cup

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना

भारताला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारतासाठी विजय आवश्यक आहे या पराभवामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचे दडपण वाढले आहे. पाकिस्तानने श्रीलंकेवर 31 धावांनी दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत आधीच दमदार सुरुवात केली आहे. भारत-पाकिस्तान सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

सलामीच्या सामन्यात भारताचा 58 धावांनी पराभव झाल्यानंतर संघाच्या कामगिरीवर विशेषत: फलंदाजीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाकिस्तानविरुद्धचा आगामी सामना जिंकून भारताला स्पर्धेत पहिला विजय मिळवून देण्यासाठी महिला संघ आसुसलेला आहे. त्यांना आज आपला खरा खेळ दाखवावा लागणार आहे.

दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा

आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवणे हे भारताचे ध्येय असते आणि आजच्या सामन्यात हेच ध्येय ठेवून महिला संघाला खेळावे लागणार आहे त्यामुळे आजचा सामना भारतासाठी महत्वाचा आहे. तर पाकिस्तानसंघाचेही हेच ध्येय असल्याने त्यांच्यासाठीही हा सामना तितकाच महत्वाचा आहे.

कुठे बघणार सामना, वेळ काय?

भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघाचा सामना आज दुपारी 3:30 वाजता सुरू होईल तत्पुर्वी नाणेफेक दुपारी 3 वाजता होईल. जगभरातील चाहते घरबसल्या आरामात या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात.हा सामना स्टार स्पोर्ट्सवर थेट प्रसारित केला जाईल, ज्यामध्ये हिंदी आणि इतर भाषांमध्ये समालोचन उपलब्ध असेल. याशिवाय, ज्या चाहत्यांना स्ट्रीमिंग पाहणे आवडते, त्यांच्यासाठी डिस्ने प्लस हॉटस्टारवर देखील सामना उपलब्ध असेल, ते सहजपणे मोबाईलद्वारे सामना थेट पाहू शकतात.

भारतीय संघात कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली स्मृती मंधानाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. , शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा. फातिमा सना यांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांकडेही आलिया रियाझ, डायना बेग आणि निदा दार यांसारख्या खेळाडूंची मजबूत लाइनअप आहे जी त्यांची छाप पाडण्यासाठी तयार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+