ind vs pak : हस्तांदोलन का केले नाही? BBCI ने पाकिस्तानला दिले 'हे' थेट उत्तर अन् शाब्दीक फटकारे
ind vs pak asia cup 2025 bcci reply on handshake snub against pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकताच आशिया कप मधील सामन झाला त्या सामन्यावरून आता टीका-टिप्पणी होत आहे. यावरुन पाकिस्तानी क्रिकेट रसिक तसेच खेळाडूंकडून टीकास्त्र सोडले जात आहे. मुळातः हा वाद तिथून सुरू झाला, जेव्हा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने सामना जिंकल्यानंतर पाकिस्तान खेळाडूंची हस्तांदोलन केले नाही, यावरून पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर यानेही दुःख व्यक्त केलं, तर पाकिस्तानातून याच मुद्द्यावरून सवाल उठवले जात आहेत.

यादरम्यान बीसीसीआयने पाकिस्तानला चांगलाच फटकारले आहे आणि नेमके नियम काय आहे तेही स्पष्टपणे दाखवून दिले आहेत. सूर्यकुमार यादव आणि इतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केले नाही, यावरून अनेक तर्क वितर्कही लावले गेले पण आता यावर बीसीसीआयने (BCCI) स्पष्टीकरण देत पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे.
बीसीसीआयने नियम स्पष्ट केले
एका वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, हस्तांदोलन करणे कोणत्याही नियमाचा भाग नाही, तो केवळ एक शिष्टाचार आहे. जेव्हा दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण असतील, तेव्हा भारतीय खेळाडूंवर अशा परंपरा पाळण्याचे बंधन नाही.
रविवारी दुबईत झालेल्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये इतका तणाव होता की, सामान्यतः कर्णधार एकमेकांना संघ पत्रिका देतात, पण या वेळी ते सुद्धा टाळण्यात आले आणि थेट मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना पत्रक देण्यात आले.
हस्तांदोलन न करण्याचा निर्णय आधीच ठरला..
एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अमानवीय आतंकवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तान संदर्भात वातावरण अत्यंत संवेदनशील आहे. याच संवेदनशीलतेमुळे, संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयने मिळून पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अचानक घेण्यात आलेला नाही, तर यावर सखोल चर्चा झाली होती.
याआधीही भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यावर आपले मत स्पष्ट केले आहे. गंभीर यांचे म्हणणे आहे की, जर भारतात आतंकवादी घटना घडत असतील, तर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याची गरज काय? याच भूमिकेवर आधारित, खेळाडूंनी आणि वरिष्ठ स्टाफने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हात न मिळवण्याचा निर्णय घेतला.












Click it and Unblock the Notifications