Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धनश्रीनंतर चहलला दुसरं प्रेम मिळालं ? यूजरने म्हटलं ही नवीन भाभी आहे का ? सोशल मिडीयावर चर्चेला उधाण

Yuzvendra Chahal: चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुध्द न्युझीलंड अंतिम सामना पाहण्यासाठी आलेल्या टीम इंडियाचा खेळाडू युजवेंद्र चहल कॅमे-यात कैद झाला. त्याच्या सोबत एक तरुणी ही दिसली आहे. दोघेही सामना पाहताना गप्पा मारताना हसताना दिसत आहे. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यानंतर ही मिस्ट्री गर्ल कोण आहे ? याबाबत आता सोशल मिडीयावर एकच चर्चा सुरु आहे.

दरम्यान धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाच्या बातम्या आणि आता युजवेंद्र चहलसोबतच्या मिस्ट्री गर्लला पाहून सोशल मीडियावरील यूजरनी ही मुलगी कोण आहे, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. काही दिवसांपासून धनश्री वर्मा आणि चहल यांच्यात घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने चर्चेत आहेत. अलिकडेच त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली होती. यानंतर दोन्ही बाजूंकडून कोणतीही पुष्टी होऊ शकली नाही. चहल आणि धनश्री दोघांनीही काहीही सांगितले नाही.

yuzvendra chahal and rj mahvash

दरम्यान चहलसोबत दिसलेली तरुणीबद्दल आता चर्चा सुरु आहे. काही यूजरने म्हटलं आहे की धनश्रीनंतर चहलला दुसरं प्रेम मिळालं तर दुस-या एका यूजरने म्हटलं आहे की, 'ही नवी भाभी आहे का?' दुसऱ्या युजरने लिहिले, 'चहल भाईचा आनंद आता कोणालाही पाहवत नाही... वाईट नजर दोघांवरही पडू नये.' दुसऱ्या युजरने कमेंट केली, 'चहल आरजे महावशला डेट करत आहे का?'

चहलसोबत स्पॉट झालेली मिस्ट्री गर्ल कोण आहे?

युजवेंद्र चहलसोबत सामना पाहण्यासाठी आलेली ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून आरजे महवाश आहे. ती एक उत्कृष्ट युट्यूबर देखील आहे. याआधीही चहलचा आरजे महवाशसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो त्याच्या कारमध्ये दिसत होता. तेव्हापासून लोक असा अंदाज लावत आहेत की घटस्फोटानंतर युजवेंद्र आरजे महवाशला डेट करत आहे. तथापि, त्यावेळी आरजे महवाशने क्रिकेटपटूसोबतच्या डेटिंगच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. त्यानंतर या दोघांकडून याबद्दल कोणतेही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+