Ind vs Nz Final: अभिषेक-संजूचा ऐतिहासिक 'रुद्रावतार'! पॉवरप्लेमध्येच किवींचा धुव्वा; रचला नवा विक्रम
Abhishek Sharma fastest fifty T20 World Cup final : T-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय सलामीवीरांनी मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या महामुकाबल्यात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने सुरुवातीच्या 6 षटकांतच 'विक्रमी' फटकेबाजी करत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्या ६ षटकांच्या अखेरीस भारताने बिनबाद ९२ धावा कुटल्या असून न्यूझीलंडचे गोलंदाज हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिषेक शर्माचे ऐतिहासिक वादळ; मोडला फिन ॲलनचा रेकॉर्ड
या सामन्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरला तो म्हणजे युवा सलामीवीर अभिषेक शर्मा. अभिषेकने केवळ 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करून इतिहास रचला आहे. जेकब डफीच्या चेंडूवर चौकार ठोकत त्याने हे शिखर गाठले.
विशेष म्हणजे, हे T-20 विश्वचषक इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या फिन ॲलन आणि जेकब बेथेल (प्रत्येकी १९ चेंडू) यांच्या नावावर होता. अभिषेकने अवघ्या एका चेंडूच्या फरकाने हा जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. सध्या अभिषेक १९ चेंडूत ५१ धावांवर खेळत आहे.
Mahi 🤝 RO!
— Star Sports (@StarSportsIndia) March 8, 2026
The first captain to win this trophy along with the last captain to win this trophy! 🤩🏆
ICC Men’s #T20WorldCup | FINAL | #INDvNZ | LIVE NOW 👉 https://t.co/Tz1DBSb4nT pic.twitter.com/Ig0jrpthux
संजू सॅमसनची साथ आणि मॅट हेनरीची धुलाई
दुसरीकडे, संजू सॅमसनने देखील अभिषेकला तोडीस तोड साथ दिली आहे. संजूने १७ चेंडूत ३३ धावांची आक्रमक खेळी केली आहे. डावाच्या पाचव्या षटकात या जोडीने मॅट हेनरीला लक्ष्य केले. त्या एकाच षटकात तब्बल २१ धावा वसूल करण्यात आल्या. यामध्ये ४ वाईड चेंडू आणि २ उत्तुंग षटकारांचा समावेश होता.
न्यूझीलंड बॅकफूटवर
सामन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी काहीसा लगाम घातला होता, मात्र अभिषेक आणि संजूने गिअर बदलताच किवी संघाची रणनीती कोलमडली. नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या हजारो चाहत्यांनी या फटकेबाजीचा मनमुराद आनंद लुटला. भारताने उभारलेली ही पायाभरणी आता मोठ्या धावसंख्येचे संकेत देत आहे.












Click it and Unblock the Notifications