Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs NZ Final: मॅच विनर खेळाडूला मैदानावरचं अश्रू अनावर, ही मोठी इच्छा अपूर्ण राहिली

IND vs NZ Final: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री रविवारी दुबई येथे भारताविरुद्ध होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. अंतिम सामन्यातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू होते. खांद्याच्या दुखापतीतून अद्याप बरा न झाल्यामुळे मॅट हेन्रीला संघातून बाहेर पडावं लागलं आहे. बुधवारी लाहोरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याला दुखापत झाली होती.

मॅट हेन्रीच्या खांद्याला दुखापत

मॅट हेन्री चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज राहिला आहे. पण हेनरिक क्लासेनचा झेल घेताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. तो मैदानाबाहेर गेला पण सामन्याच्या शेवटी दोन षटके टाकण्यासाठी परतला. परत आल्यानंतर मैदानावर काही काळ दिसला. मात्र आज अंतिम सामन्यासाठी मैदानाच्या बाहेर बसावं लागलं आहे.

matt henry

मॅट हेन्रीला मैदानावरचं अश्रू अनावर झाले

अंतिम सामन्यापूर्वी हेन्रीला संघाचा निर्णय स्वीकारावा लागला. परंतु सामन्याच्या फिटनेस चाचणीत तो नापास झाल्यामुळे त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. टॉसच्या काही मिनिटांपूर्वी 33 वर्षीय हेन्री आपले ओले डोळे पुसताना दिसला तर प्रशिक्षक गॅरी स्टीडने त्याच्या पाठीवर थाप मारून त्याचे सांत्वन केले. हा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मॅट हेन्रीची चॅम्पियन्स ट्रॉफीत दमदार कामगिरी

सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील मॅट हेन्रीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने चार सामन्यांमध्ये 16.70 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या आहेत. गेल्या रविवारी भारताविरुद्धच्या गट सामन्यात त्याने 42 धावांत 5 बळी घेतले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळण्याची त्याची इच्छा अपूर्ण राहिली.

भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड संघ: विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+