Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs NZ Final: कुलदीप यादवचा जादुई चेंडू स्टंपमध्ये वळला, रचिन रवींद्र पाहतच राहिला

IND vs NZ Final: भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना दुबई स्टेडियमवर सुरु आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने भारताविरुद्ध दमदार सुरुवात केली. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रचिन रवींद्रलाही दोन वेळा जिवनदान मिळालं. पण शेवटी कुलदीप यादवने त्याचा डाव संपवला.

रचिन रवींद्रला कुलदीपने बाद केले (IND vs NZ Final)

रचिन रवींद्र चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. दोन जीवदान मिळाल्यानंतरही तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही आणि कुलदीप यादवच्या पहिल्याच चेंडूवर त्याला क्लिन बोल्ड केलं. कुलदीप यादवचा सापासारखा चेंडू यष्टीवर आदळला, जो पाहून रचिन रवींद्रही आश्चर्यचकित झाला. ही विकेट घेतल्यानंतर कुलदीप यादवने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मासह टीमने सेलीब्रेशन केलं

kuldeep yadav

केन विल्यमसनलाही दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता

रचिनच्या 37 धावांच्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार त्याने लगावला. रचिन रवींद्रनंतर केन विल्यमसनही कुलदीप यादवच्या फिरकीत अडकला. कुलदीप यादवच्या चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना केन विल्यमसनने त्याचा झेल देऊन बाद झाला. सलग दोन विकेट घेतल्यानंतर भारताने सामन्यात पुनरागमन केले आहे. रोहित शर्माने योग्य वेळी कुलदीप यादवकडे चेंडू सोपवला आणि तो संघासाठी दमदार कामगिरी करण्यात यशस्वी झाला.

न्यूझीलंड: विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क, नाथन स्मिथ.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+