चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शमीला दुखापत, शम्मीच्या मैदानावरील खराब कामगिरीवर प्रश्नचिन्ह
IND vs NZ Final: भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना युएईमधील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू आहे. किवी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी पन्नास धावांची भागीदारी करुन संघाला दमदार सुरुवात करुन दिली. मात्र कुलदीप यादवच्या फिरकीपुढे न्युझीलंड संघाचा स्टार खेळाडून रचिन रविंद्र आणि केन विल्यमसन स्वस्तात बाद झाले.
न्युझीलंडच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. भारताला यश मिळवून देण्यासाठी अनेक संधी मिळाल्या. त्यानंतर शमीने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल सोडल्यानंतर इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. मोहम्मद शम्मीने रचिन रविंद्रचा झेल सोडला. मात्र त्यानंतर कुलदीप यादवने रचिन रविंद्रला बाद केले.

शमीने केवळ झेल सोडला नाही तर त्याच्या डाव्या हातालाही दुखापत झाली. गोलंदाजाला स्वतःच्या गोलंदाजीवर विकेट घेण्यासाठी किती रिफ्लेक्सेस दाखवावे लागतात त्यापेक्षा ही तुलनेने सोपी संधी होती. चेंडू हातावर आदळल्यानंतर लगेचच शमीने फिजिओला बोलावले आणि नंतर त्याच्या हाताला पट्टी बांधण्यात आली.
शमीची मैदानावर खराब कामगिरी
नुकताच भारतीय संघात परतलेला शमी मागील सामन्यांमध्येही झेल सोडल्यामुळे त्याला मैदानावर कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात शमीने स्वतःच्या गोलंदाजीवर दोन झेल सोडले. तसेच विकेट घेण्यासाठीही संघर्ष करत आहे. शम्मीच्या मैदानावरील खराब कामगिरीवर आता यूजर सोशल मिडीयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड संघ: विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क.
— kuchnahi123@12345678 (@kuchnahi1269083) March 9, 2025












Click it and Unblock the Notifications