टॉसच्या बाबतीत रोहितचे नशीबच फुटकं; बनवला असा रेकॉर्ड, ब्रायन लाराच्या बरोबरीत जाऊन बसला
Rohit Sharma Toss Record : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेतेपदाच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच, या सामन्यात भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करायला आला. परंतु नाणेफेक जिंकण्यात पुन्हा रोहित शर्मा अपयशी झाला आहे.
रोहितच्या नावावर पुन्हा एक अनोखा रेकॉर्ड
अशाप्रकारे, नाणेफेकीदरम्यान भारतीय संघाचे नशीब पुन्हा एकदा अपयशी ठरले. भारतीय संघ 15 व्या वेळी नाणेफेक गमावला. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात 12 व्यांदा टॉस गमावला, अशा प्रकारे तो टॉस हरण्याच्या बाबतीत संयुक्तपणे तो ब्रायन लाराच्या बरोबरीचा झाला.

2023 पासून सलग 15 वेळा टॉस गमावला
2023 च्या क्रिकेट फायनलपासून भारताने सलग 15 वेळा टॉस गमावला आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात कोणत्याही संघाचा हा सर्वात लांबचा विक्रम असणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात रोहितने पुन्हा एकदा नाणेफेक गमावली.
याच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने नेदरलँड्सचा पराभव केला होता. मार्च 2011 ते ऑगस्ट 2013 दरम्यान नेदरलँड्सने 11 वेळा नाणेफेक गमावली. भारताने शेवटचा एकदिवसीय सामन्यात 2023 च्या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध टॉस जिंकला होता. तेव्हापासून भारतीय संघ सतत नाणेफेक गमावत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 11 वेळा आणि केएल राहुलच्या नेतृत्वाखाली 3 वेळा टॉस गमावला आहे.
टॉस गमावल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
टॉस हरल्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'आम्ही खूप दिवसांपासून इथे (दुबई) आहोत. आता आम्हाला नंतर फलंदाजी करण्यात काहीच अडचण नाही. यामध्ये फारसा बदल झालेला नाही. आम्ही लक्ष्याचा पाठलाग केला आणि जिंकलोही. यामुळे तुम्हाला खूप आत्मविश्वास मिळतो. दिवसाअखेर तुम्हाला किती चांगले खेळायचे आहे हे महत्त्वाचे आहे.
रोहित म्हणाला, 'आम्ही ड्रेसिंग रूममध्येही हेच सांगितले होते. नाणेफेकीची काळजी करू नका आणि फक्त चांगले खेळा. हेच आपण केले आहे आणि आजही आपल्याला हेच करायचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून न्यूझीलंड हा खूप चांगला संघ आहे, ते आयसीसी स्पर्धांमध्ये चांगले क्रिकेट खेळतात. आता आमच्यासमोर आव्हान आहे की त्यांच्याविरुद्ध चांगले खेळणे. आमच्या संघात कोणताही बदल झालेला नाही.
सर्वाधिक सलग नाणेफेक पराभव
- १२ रोहित शर्मा (नोव्हेंबर २०२३ - मार्च २०२५)*
- १२ ब्रायन लारा (ऑक्टोबर १९९८ - मे १९९९)
- ११ पीटर बोरेन (मार्च २०११ - ऑगस्ट २०१३)












Click it and Unblock the Notifications