IND vs NZ Final: अंतिम सामन्याची खेळपट्टी कशी असेल? मोठा खुलासा, विराट कोहलीसाठी आनंदाची बातमी!
IND vs NZ Champions Trophy 2025 Final: भारतीय क्रिकेट चाहते 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या विजयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय संघ 9 मार्च रोजी दुबईमध्ये न्यूझीलंडशी भिडणार आहे. सामन्याचा निकाल ठरवण्यात परिस्थिती मोठी भूमिका बजावते. अशा परिस्थितीत अंतिम सामन्यासाठी कोणता ट्रॅक वापरला जाईल, असा प्रश्नही उपस्थित होतो. आता यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.
अंतिम सामना कोणत्या खेळपट्टीवर खेळला जाईल?
टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी वापरण्यात आलेली खेळपट्टी न्यूझीलंडविरुद्धच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी वापरली जाईल. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून त्या ट्रॅकवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण तो ट्रॅक भारतीय फिरकीपटूंसाठी खूप उपयुक्त असल्याने त्याच्यासाठी ते कठीण झाले होते.

भारत जिंकला होता
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 241 धावा केल्या होत्या. अबरार अहमदने चांगली गोलंदाजी केली असली तरी पाकिस्तानकडे फिरकी गोलंदाजाची कमतरता असल्याने भारताने 42.3 षटकांत सहा विकेट्स राखून लक्ष्य गाठले. या खेळपट्टीवर विराट कोहलीने शतक झळकावले होते. अशा परिस्थितीत जर सामना येथे झाला तर कोहलीसाठी ही खूप चांगली बातमी असेल. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन अंतिम फेरीत पोहोचलेला किवी संघ पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटूंचा सामना करणार आहे.
भारतीय गोलंदाजीची ताकत
गोलंदाजांचा विचार केल्यास भारताची मदार वरुण चक्रवर्तीवर आहे मागील सामन्यासारखीच त्याने जर कामगिरी केली तर भारताला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एवढेच नाही तर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्या गोलंदाजी आणि फलंदाजीने मैदानात केलेली अप्रतिम कामगिरी गोलंदाजांना खूप मदत करते. अशा परिस्थितीत टीम इंडिया आणखी एक आयसीसी विजेतेपद मिळवू शकते अंतिम सामन्याचा ट्रॅक भारत विरुद्ध पाकिस्तानच्या ट्रॅकपेक्षा हळू असू शकतो.












Click it and Unblock the Notifications