IND vs ENG :आज पाचवा T20 मॅच कोण जिंकणार? जाणून घ्या भारताने आतापर्यंत इंग्लडविरुद्ध किती मॅच जिंकले

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा T20 सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. या संघादरम्यानची मालिका यापुर्वीच भारताने खिशात घातली आहे. त्यामुळे हा सामना आता इंग्लंडसाठी औपचारिक राहीला असेच म्हणता येणार आहे.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमध्ये भारताने तीन वेळा विजय मिळवत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पुणे येथे झालेल्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवला. तर राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियावर विजय मिळवला होता.

IND vs ENG

याशिवाय पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातही इंग्लडला पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लिश संघ अंतिम सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल पण हे सोपे काम म्हणता येणार नाही कारण भारतीय संघ जोमात आहे.

आज भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतात. मालिका जिंकल्यामुळे संघात बदल करण्याची संधी आहे. गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव आज संघबदलासाठी काही वेगळे करू शकतात तर दुसरीकडे, इंग्लंड संघात बदल होण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे.

टीम इंडियाने इंग्लंडला 16 सामन्यात पराभूत केले आहे. दुसरीकडे, इंग्लंड संघाला केवळ 12 वेळा विजयाची नोंद करण्यात यश आले आहे. आजही इंग्लिश संघाचा मार्ग खडतर होणार आहे. इंग्लंडला पराभवाला सामोरे जावे लागू शकते. टीम इंडिया हा सामना जिंकून ट्रॉफी 4-1 ने जिंकू शकते.

IND vs ENG 4th T20I" भारतीय संघ -

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन संदार, हर्षित राणा, वॉशिंग्टन संदार, हर्षित राणा, भवन, रमणदीप सिंग

IND vs ENG 4th T20I" इंग्लड टीम -

फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रेडन कारसे, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद, जेमी स्मिथ, मार्क वुड, गस ऍटकिन्सन, रेहान अहमद

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+