Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs ENG : विराट कोहली संघात परतला तर कुणाला वगळणार! वाचा कटक वनडेमध्ये टीम इंडियाची प्लेईंग 11

IND vs ENG Playing 11 : भारत आणि इंग्लडदरम्यान सुरु असलेल्या वनडे मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना कटकमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचा कसून सराव सुरु आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडिया मालिका विजय मिळवण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे इंग्लड संघ आपला पहिला वहिला वनडे सामना जिंकण्याच्या तयारीत आहे.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे नागपूरमधील पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकलेला विराट कोहली पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. अशा परिस्थितीत, अंतिम अकरा संघात आता बदल करणे आवश्यक ठरणार आहे. कारण भारतासाठी विराट कोहली एक भक्कम आणि ताकदीचा फलंदाज आहे. त्याच्याजागी कुणाला तरी डच्चू द्यावाच लागणार हे निश्चित आहे. त्यामुळेच आपण आता टीम इंडियाच्या संभाव्य प्लेईंग 11 मध्ये कुणाची वर्णी लागणार हे पाहूया.

IND vs ENG Playing 11

रोहीत शुभमन सलामीला येणार

भारतीय संघाचा धुरंधर बॅट्समन रोहित शर्मा आणि शुभमन गिल पुन्हा एकदा डावाची सुरुवात करताना दिसू शकतात. ते सलामीला बॅटींगसाठी आल्यास विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. तो त्याच्या तिसऱ्या स्थानावर परत येण्यास उत्सुकही असू शकतो. तर श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतोआणि त्यानंतर पाचव्या क्रमांकावर केएल राहुल आणि त्यानंतर हार्दिक पांड्या खेळण्यासाठी येऊ शकतो. हार्दीकवर बॅटींगसोबतच पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजीची मदार आहे.

मोहम्मद शमीला मिळू शकतो डच्चू?

गोलंदाजीत विचार केल्यास काही बदल होऊ शकतात. रवींद्र जडेजा अष्टपैलू म्हणून चांगली कामगिरी करत आहे त्याने आधीच्या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने फलंदाजीने चांगली कामगिरी केली आणि 52 धावा केल्या. हे दोघे संघात राहतील तर मोहम्मद शमीला विश्रांती दिली जाऊ शकते आणि अर्शदीप सिंगला संधी मिळेल अशी शक्यता आहे तर वरुण चक्रवर्तीलाही बाहेर राहायची वेळ येऊ शकते.

भारताचा संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+