Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind vs Eng : भारताचा इंग्लडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय; अभिषेक शर्माचे अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक

Ind vs Eng India won by 7 Wickets : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने 7 विकेट्सने जिंकला. अभिषेक शर्माने इंग्लडविरुद्ध तडाखेबंद फलंदाजी करत अवघ्या 20 चेंडूत 50 धावा कुटल्या. त्याच्या एकतर्फी खेळीने भारताने इंग्लडवर सहज विजय मिळवला.

भारत विरुद्ध इंग्लड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 132 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Ind vs Eng India won by 7 Wickets

तत्पूर्वी विजयासाठी भारताला इंग्लड संघाने 133 धावांचे आव्हान दिले आहे. भारतीय संघाच्या फलंदाजांनी 3 गड्याच्या मोबदल्यात या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत विजय साकार केला.

हेही वाचा : Ind vs Eng : अर्शदीप सिंगने इतिहास रचला! T-20 मध्ये चहलला मागे टाकत बनला टीम इंडियाचा नंबर-1 गोलंदाज

अभिषेक शर्माचे जलद अर्धशतक

  • सलामीला फलंदाजीसाठी आलेला संजू सॅमसन 20 चेंडूत 26 धावा करुन बाद झाला. गो जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर तो गस एॅटकिन्सनकडे झेल देऊन बसला.
  • त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा आज फलंदाजीत अपयशी ठरला. त्याला एकही धाव काढता आली नाही. तो शुन्यावर गो जोफ्रा आर्चर याच्या गोलंदाजीवर फिलिप साॅल्टकरवी झेलबाद झाला.
  • दोघे फलंदाज बाद होत असताना दुसरा सलामीवर हा धावांचा पाऊस पाडत होता. त्याने अवघ्या 20 चेंडूत 50 धावा कुटत आपले अर्धशतक दिमाखात साजरे केले. त्याने 34 चेंडूत 79 धावा करुन बाद झाला.
  • अभिषेक वर्माने विकेट गमावल्यानंतर हार्दीक पांड्या आणि तिलक वर्माने भारतीय संघाचा औपचारीक राहीलेला विजय साकार केला.

अर्शदीप सिंगने चमत्कार केला

तत्पूर्वी अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला बाद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. फिल सॉल्टनंतर अर्शदीप सिंगने बेन डकेटलाही आपला शिकार बनवले. रिंकू सिंगने कॅच पकडल्यानंतर बेन डकेट पॅव्हेलियनमध्ये परतला.

हेही वाचा : तब्बल वर्षभरानंतर मोहम्मद शमीचे भारतीय संघात पुनरागमन; इंग्लंड T-20 मालिकेतून करणार पदार्पण

बटलरची कर्णधारपदाला साजेशी खेळी

जोस बटलरने कर्णधारपदाची खेळी करत एका बाजूने इंग्लंडला सावरण्याचे काम केले. कर्णधारपदाची खेळी खेळताना त्याने वेगवान अर्धशतक झळकावले. जोस बटलर 45 चेंडूत 68 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर नितीश कुमार रेड्डीने जोस बटलरचा जबरदस्त झेल घेतला. इंग्लंडकडून जोस बटलरने कर्णधारपदाची जबरदस्त खेळी खेळली.

वरुण चक्रवर्तीने घेतल्या 3 विकेट्स

भारताचा उदयोन्मुख धुरंधर गोलंदाज वरुण चक्रवर्तीने 4 षटकात 23 धावा देत तीन बळी घेतले. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने हॅरी ब्रुकला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. ब्रूक 14 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. वरुण चक्रवर्तीने अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा डाव संपुष्टात आणला. वरुण चक्रवर्तीशिवाय अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या विकेट घेण्यात यशस्वी ठरले.

हेही वाचा : भारत-इंग्लंडमधील पहिला टी-20 सामना किती वाजता सुरू होईल? लाईव्ह सामना कुठे पाहायचा, घ्या जाणून

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+