तब्बल वर्षभरानंतर मोहम्मद शमीचे भारतीय संघात पुनरागमन; इंग्लंड T-20 मालिकेतून करणार पदार्पण
IND Vs ENG T20 Squad : इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे पुनरागमन झाले आहे. एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यानंतर तब्बल 14 महिन्यांनी तो आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करणार आहे.
त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना आता आराम करण्यासाठी टीममधून बाहेर काढण्यात आले आहे. शनिवारी रात्री बीसीसीआयने संघाची यादी जाहीर केली.
संघात कोणाचा समावेश, कोणाला डच्चू?
अक्षर पटेलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे, सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करेल. ऋषभ पंतला स्थान मिळाले नाही, त्याच्या जागी ध्रुव जुरेल बॅकअप यष्टिरक्षक असेल.
वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारी रोजी खेळला जाईल. त्यानंतर ६ फेब्रुवारीपासून 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होईल.

भारताचा T-20 संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर.
संघ निवडताना कोणत्या गोष्टीचा झाला विचार
मोहम्मद शमी 14 महिन्यांनंतर पुनरागमन करत आहे. त्याने भारतासाठी शेवटचा सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी खेळला. शिवम दुबे, जितेश शर्मा, ऋषभ पंत आणि आवेश खान यांना स्थान मिळाले नाही. ध्रुव जुरेल आणि हर्षित राणा यांना स्थान मिळाले. नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या चार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे.
शमीची देशांतर्गत क्रिकेटमध्ये कशी केली कामगिरी?
मध्य प्रदेशविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत बंगालकडून खेळण्यासाठी शमी दुखापतीतून परतला. तो सय्यद मुश्ताक अली (टी20) आणि विजय हजारे ट्रॉफी (एकदिवसीय) मध्येही खेळला, ज्यामुळे त्याच्या भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा वाढल्या.












Click it and Unblock the Notifications