Shubman Gill : शुभमन गिलचा विक्रम; सुनील गावस्कर यांना मागे टाकत रचला इतिहास, जाणून घ्या सर्व काही!
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत 11 धावांवर बाद झाला असला, तरी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने या मालिकेत एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. या मालिकेत त्याने केलेल्या दमदार कामगिरीमुळे तो भारताकडून एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे.
एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
शुभमन गिलने या मालिकेत 10 डावांमध्ये 75.40 च्या सरासरीने 754 धावा केल्या. यामध्ये चार शतके आणि 269 धावांची सर्वोच्च खेळी समाविष्ट आहे. या कामगिरीमुळे तो सुनील गावस्कर यांच्या 1971 सालच्या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे.

- ७७४ - सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज, १९७१ (विदेशात)
- ७५४ - शुभमन गिल विरुद्ध इंग्लंड, २०२५ (विदेशात)
- ७३२ - सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज, १९७८/७९ (भारतात)
- ७१२ - यशस्वी जयस्वाल विरुद्ध इंग्लंड, २०२४ (भारतात)
- ६९२ - विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१४/१५ (विदेशात)
कर्णधार म्हणून विक्रमी कामगिरी!
शुभमन गिलने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच मालिकेत ७५० पेक्षा अधिक धावा करत महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. ब्रॅडमन यांनी कर्णधार म्हणून पदार्पणाच्या मालिकेत ८१० धावा केल्या होत्या. यासह, गिलने सुनील गावस्कर यांना मागे टाकत एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार होण्याचा मान मिळवला.
- ८१० - डॉन ब्रॅडमन विरुद्ध इंग्लंड (१९३६)
- ७५४ - शुभमन गिल विरुद्ध इंग्लंड (२०२५)
- ७५२ - ग्रॅहम गूच विरुद्ध भारत (१९९०)
- ७३२ - सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज (१९७८)
या मालिकेतील विक्रमी कामगिरीमुळे शुभमन गिलची गणना आता भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांमध्ये होऊ लागली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करित आहेत.












Click it and Unblock the Notifications