Jasprit bumrah टीम इंडियाला धक्का! जसप्रित बुमराह 5 व्या कसोटीला मुकणार! त्याला का वगळले? जाणून घ्या
IND vs ENG 5th Test Jasprit bumrah drop in team 11 : टीम इंडियाचा हुकमी एक्का आणि आघाडीचा गोलंदाज जसप्रित बुमराह याला पाचव्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. हा टीम इंडियासाठी मोठा धक्का असून पाचव्या कसोटीत विजयासह भारताला मालिकेत बरोबरी साधण्याची संधीला काहीप्रमाणात तडा गेला आहे. आता त्याच्या जागी कोण या सवालाची कसरही एका चांगल्या गोलंदाजाच्या रुपात टीम इंडियाला भरुन काढावी लागणार आहे.
भारताचा पाचवा कसोटी सामना ओव्हल येथे इंग्लड संघासोबत होणार आहे. सध्या इंग्लडकडे दोन विरुद्ध एक अशी आघाडी आहे. पहिली कसोटी इंग्लंडने जिंकल्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत इंग्लंडसमोर आव्हान कायम ठेवले पण तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने भारतावर निसटता विजय मिळवला, चौथा कसोटी सामना भारताला अनिर्णित ठेवण्यात मोठे यश मिळाले, आता निर्णायक पाचवी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचे ध्येय टीम इंडियाचे होते पण या ध्येयाला काही प्रमाणात धक्का बसला आहे.

बुमराह का वगळले
जसप्रित बुमराह लीड्समध्ये मालिकेचा पहिला सामना खेळला आणि नंतर बर्मिंगहॅममध्ये दुसऱ्या सामन्यात त्याला खेळता आले नाही. नंतर लॉर्ड्सवरील तिसरा आणि ओल्ड ट्रॅफर्ड येथे चौथा कसोटी सामना त्याने खेळला, पण पाचव्या कसोटी सामन्यात त्याला खेळण्यास अडचणी येत आहेत, ही अडचण शारिरीक आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला पाठीची मोठी दुखापत झाली होती, त्यामळे हे पाठीचे दुखणे पुन्हा होऊ नये यासाठी संघ काळजी घेत आहे.
पाठीचा दुखापत सतावतेय
ESPNCricinfo च्या अहवालानुसार, भारतीय संघ व्यवस्थापन आणि BCCI च्या वैद्यकीय तज्ज्ञांनी पाठीच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. मोठी गोष्ट म्हणजे या मालिकेत भारत पिछाडीवर जरी असला तरीही भविष्याचा विचार करता त्याला आराम करु देणे हेच योग्य असल्याचे मत संघ व्यवस्थापनाचे बनले आहे. विशेष म्हणजे बुमराह पाचपैकी फक्त तीन कसोटी सामनेच खेळेल असे संकेत मालिका सुरू होण्यापूर्वी, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिले होते.
हेही वाचा : India vs England : 'हे' 5 फलंदाज ज्यांच्यामुळे चौथा कसोटी सामना गमावला! काय झाल्या चुका? घ्या जाणून
जसप्रित बुमराहच्या जागी कोण?
जसप्रित बुमराह दुखापतीतून सावरण्यासाठी आराम करणार आहे, त्यामुळे पाचव्या कसोटीत त्याच्या जागी कंबरेच्या दुखापतीमुळे चौथी कसोटी गमावलेला आकाश दीप पुन्हा संघात परतणार आहे. याव्यतिरिक्त, अंशुल कंबोजच्या जागी अर्शदीप सिंग कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : IND vs ENG : निर्णायक पाचवा कसोटी सामना कधी व कुठे खेळला जाणार, कुठे लाईव्ह पाहता येणार?, जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications