Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs ENG Live updates : भारत आणि इंग्लंड संघातील दुसरा oneday मॅच कधी अन् कुठे होणार? जाणून घ्या

IND vs ENG 2nd one day match Live updates : सध्या भारतीय संघ खूपच फाॅर्ममध्ये आहे, इंग्लडविरुद्ध भारतीय संघाने T20 सीरीज जिंकून आपणच क्रिकेटचे राजे असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर वनडे मालिकेलाही सुरुवात झाली असून भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात इंग्लड संघाला पाणी पाजले.

नागपूर एकदिवसीय सामना जिंकून, भारतीय संघाने इंग्लंडवर मानसिक आघाडीसह मालिकेत 1-9 अशी आघाडी मिळवण्यात यश मिळवले आहे. भारतीय संघाने हा सामना 6 विकेट्सच्या मोठ्या फरकाने जिंकला. टीम इंडियाला विजयाने आत्मविश्वास मिळाला आहे तर इंग्लंडसाठी आता परिस्थिती आणखी बिकट होताना दिसत आहे. जर इंग्लिश संघ पुढचा सामना जिंकण्यात अपयशी ठरला तर मालिका गमावेल.

IND vs ENG 2nd one day match

इंग्लंडला टी-20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागला आणि आता एकदिवसीय मालिकेची सुरुवातही वाईट झाली आहे. दुसरा एकदिवसीय सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे कारण त्यात विजय मिळवल्यास ट्रॉफी निश्चित होईल. इंग्लंडसाठी ही परिस्थिती करा किंवा मरो अशी असेल. अशा परिस्थितीत, दुसरा एकदिवसीय सामना कधी आणि कुठे खेळला जाईल हे जाणून घेऊया.

हेही वाचा : IND vs ENG : श्रेयस- जडेजाचे विश्वविक्रम, राणाचाही नकोसा विक्रम; नागपूर वन-डेत विक्रमांचा पाऊस

भारत विरुद्ध इंग्लंड: दुसरा एकदिवसीय सामना कधी होईल?

दोन्ही संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना लवकरच होणार आहे. पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात दोन दिवसांचे अंतर आहे. खेळाडू प्रवास आणि इतर गोष्टींसाठी वेळ घेतात म्हणून हे करण्यात आले आहे, म्हणून हा सामना 9 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या अंतराने होणार आहे.

IND vs ENG: दुसरा एकदिवसीय सामना कुठे होणार आहे?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना गेल्या पाच वर्षांपासून धूळ साचलेलया स्टेडियममध्ये होणार आहे. आता या स्टेडियममध्ये सामना खेळण्याची वेळ आहे. हे स्टेडियम ओडिशामध्ये आहे. हा सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर होणार आहे. 2019 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात शेवटचा सामना तिथे खेळला गेला होता. आता पाच वर्षांनी पुन्हा एकदा तिथे सामना होणार आहे.

कटकमध्ये दोन्ही संघांचा रेकॉर्ड

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामने कटकमध्ये यापूर्वीही झाले आहेत. या स्टेडियमवर दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले आहेत. हे स्टेडियम इंग्लंडसाठी भाग्यवान राहिले नाही. इंग्लंड संघाला पाचही सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा : IND vs ENG Live Streaming : भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेचे वेळापत्रक; कुठे होणार मॅच?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+