Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video : यशस्वी जयस्वालचा पदार्पणाच्या सामन्यात शानदार झेल, हर्षित राणाने ही घेतल्या 3 विकेट

IND vs ENG: नागपूरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाच्या दोन युवा खेळाडूंनी पदार्पण केलं. त्यापैकी एक नाव यशस्वी जयस्वाल आहे. जयस्वालने यापूर्वी भारतासाठी कसोटी आणि टी-20 सामने खेळले आहेत, पण यावेळी त्याला पन्नास षटकांच्या फॉर्मेटमध्ये संधी मिळाली आहे.

क्षेत्ररक्षणादरम्यान जयस्वालने आपला पदार्पणाचा सामन्यात एक शानदार झेल घेऊन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जयस्वालने या शानदार झेलने सर्वांना प्रभावित केले .

yashasvi jaiswal and harshit rana

यशस्वी जयस्वालचा अप्रतिम झेल

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजी करण्याचा निर्णय घेतला. हर्षित राणाच्या एकाच षटकात फिल सॉल्टने एकूण 26 धावा फटकावल्या. यानंतर तो श्रेयस अय्यरच्या थ्रोवर धावबाद झाला पण बेन डकेट क्रीजवर होता आणि 32 धावांवर फलंदाजी करत होता.दरम्यान, त्याने हर्षित राणाचा एक शॉर्ट बॉल हवेत खेळला त्यावेळी जयस्वालने झेल घेण्यासाठी मागे धावत एक शानदार झेल घेतला आहे.

यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा शानदार कामगिरी

इंग्लंड विरुध्द सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडिया या दोन युवा खेळाडूंनी पदार्पण केलं आहे. दोघांनी आतापर्यं या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यशस्वी जैस्वालने अप्रतिम झेल घेतला आहे. हर्षित राणाने पहिल्याच एकदिवसीय सामन्यात महत्वाच्या 3 विकेट बळकावल्या आहेत.

जयस्वालची झेल पकडण्याची स्टाईल 1983 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात कपिल देवसारखीच होती. कपिल देवनेही मागे धावताना अशाच पद्धतीने विवियन रिचर्ड्सचा झेल घेतला होता. जयस्वालने त्याच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात कपिल देवची आठवण करून दिली त्यावेळी प्रेक्षकांनी यशस्वीच्या नावाचा जयघोष केला..

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+