कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडणार? हिटमॅनचा खराब फॉर्म सुरूच

IND vs ENG 1st ODI Rohit Sharma: रणजी ट्रॉफीनंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीत अपयशी ठरला आहे. संघाला रोहित शर्माकडून चांगली सुरुवातची अपेक्षा होती. पण हिटमन चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरला.

विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर टीम इंडियाने चार विकेट्सने विजय मिळवला आहे. पण कर्णधार रोहितची बॅट पुन्हा एकदा आक्रमण करण्यात अपयशी ठरली आहे.

Rohit Sharma

फोटो सौजन्य- पीटीआय

रोहितचा खराब फॉर्म सुरूच

या सामन्यात रोहित शर्मा फक्त दोन धावा करुन बाद झाला. यशस्वी जयस्वालसोबत सलामीला आलेला रोहित शर्मा संघाला चांगली सुरुवात देऊ शकला नाही. साकिब महमूदने रोहितला त्याच्या चेंडूवर बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारताला पहिला मोठा धक्का दिला. रोहित शर्मा व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाललाही त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. नागपूर एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहितने 7 चेंडू खेळले पण त्याच्या लयीत नसल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा संघासाठी कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.

16 डावांमध्ये केला हा विक्रम

रोहितने तिन्ही फॉरमॅटमध्ये गेल्या 16 डावांमध्ये फक्त 166 धावा केल्या आहेत. या काळात रोहित शर्माची फलंदाजीची सरासरी फक्त 10.37 आहे. रोहितची ही कामगिरी पाहून चाहते त्याच्या फॉर्मबद्दल सतत चिंता व्यक्त करत आहेत. काही चाहते तर संतापले आहेत आणि रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीमधून वगळण्याची मागणी करत आहेत.

इंग्लंड संघ: बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+