Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीचा मोठा रेकार्ड! एकदिवसीय सामन्यात 200 विकेट पुर्ण

mohhamad Shami creats new record 200 wickets completed: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात दुबई येथे सामना सुरु आहे. टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात दणदणीत विजयाने करण्याचा प्रयत्न करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ भक्कम दिसत आहे. टीम इंडियांच्या गोलंदाजी समोर बांग्लादेशच्या खेळाडूने गुडघे टेकले आहेत.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात मोठी कामगिरी केली आहे. विश्वचषकानंतर पहिलाच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत मोहम्मद शमीने 4 विकेट घेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यासह, तो ही कामगिरी करणारा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज बनला आहे.

mohhamad Shami

34 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात 4 बळी घेण्यात यशस्वी ठरला आहे, तर तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये 'विकेट्सचे दुहेरी शतक' झळकावलं आहे. मोहम्मद शमी आंतरराष्ट्रीय वनडे फॉरमॅटमध्ये 200 विकेट पूर्ण केल्या आहेत.

शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण केले. सर्वात जलद 200 एकदिवसीय विकेट्स घेण्याच्या बाबतीत शमीचे नाव जागतिक क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पहिले नाव मिचेल स्टार्कचे आहे. हा आकडा गाठण्यासाठी शमीने एकूण 104 सामने खेळले.

मिचेल स्टार्कने 102 सामन्यांमध्ये हा आकडा गाठला. मोहम्मद शमीसाठी हा एक मोठा टप्पा आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान हा विक्रम करता आला असता पण तो त्या मालिकेतील सर्व सामने खेळू शकला नाही.

कोणता भारतीय खेळाडू आहे आघाडीवर?

टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 बळींचा टप्पा खूप कमी फलंदाजांनी गाठला आहे. हा आकडा गाठणारा शमी आठवा गोलंदाज आहे. इथेही अनिल कुंबळेचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील आहे. कुंबळेच्या नावावर एकदिवसीय सामन्यात 334 विकेट्स आहेत.

भारताच्या आठ गोलंदाजांनी केला हा पराक्रम

कुंबळे व्यतिरिक्त, श्रीनाथ, अजित आगरकर, झहीर खान, हरभजन सिंग, कपिल देव इत्यादी गोलंदाजांनीही हा आकडा गाठला आहे. शमीसाठी हा आकडा खास आहे कारण त्याने सर्वात कमी सामन्यांमध्ये इतक्या विकेट्स घेतल्या आहेत. शमीसमोर मोठे फलंदाज धावांसाठी आसुसलेले असतात.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 बळी घेणारा गोलंदाज

मिचेल स्टार्क - 102 सामने
मोहम्मद शमी - 104
सकलेन मुश्ताक - 104 सामने
ट्रेंट बोल्ट - 107 सामने
ब्रेट ली - 112 सामने

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+