IND vs BAN: रोहित शर्माने गाठला 'हा' मैलाचा दगड; 'असे' करणारा चौथा भारतीय. तर जगातील 10 वा फलंदाज
Champions Trophy 2025 Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात एक विशेष कामगिरी नोंदवली आहे. रोहितने एकदिवसीय सामन्यात 11000 धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात कमी डावांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.

यासोबतच रोहितने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला ही मागे टाकले. रोहितने 11000 धावा पूर्ण करण्यासाठी 261 डावात पूर्ण केल्या आहेत तर सचिनने 276 व्या एकदिवसीय डावात ही कामगिरी केली आहे.
11000 धावा करणारा चौथा भारतीय
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद गतीने 11000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. कोहलीने 222 एकदिवसीय डावांमध्ये ही कामगिरी केली. पॉन्टिंगने 286 चेंडूत 11000 धावा पूर्ण केल्या. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने 288 एकदिवसीय डावात 11000 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात 11000 धावा करणारा रोहित हा चौथा भारतीय आहे. रोहितच्या आधी सचिन, कोहली आणि गांगुलीने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सर्वात कमी डावांमध्ये 11000 एकदिवसीय धावा करणारे खेळाडू
विराट कोहली - 222- डाव
रोहित शर्मा - 261- डाव
सचिन तेंडुलकर - 276- डाव
रिकी पॉन्टिंग - 286 -डाव
सौरव गांगुली - 288- डाव












Click it and Unblock the Notifications