IND vs AUS T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 साठी टीम जाहीर; रोहित-कोहली बाहेर! वाचा संघात कोण-कोण?
IND vs AUS T20 Squad Announced : एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर (२-१) आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गजांना विश्रांती देण्यात आली असून, संघाची धुरा 'मिस्टर ३६०' सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची नुकतीच संपलेली एकदिवसीय मालिका २-१ ने गमावली आहे. आता या दोन संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा मार्ग नक्कीच सोपा नसेल.
कोण आहेत संघाबाहेर?
- कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली या दोघांनाही या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
- केएल राहुल हा देखील टी-२० संघातून बाहेर आहे. तो २०२२ टी-२० वर्ल्ड कपपासून या फॉर्मेटमध्ये खेळलेला नाही, मात्र टेस्ट आणि वनडे संघात नियमित आहे.
- एकदिवसीय संघाचा भाग असलेले मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनाही टी-२० संघात स्थान मिळालेले नाही.
- एकदिवसीय संघात सामील असलेले ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनाही टी-२० संघातून वगळण्यात आले आहे.
सूर्या करणार नेतृत्व, 'या' खेळाडूंवर असेल लक्ष
- या मालिकेतील सर्वात मोठा बदल म्हणजे कर्णधारपद. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे, तर शुभमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
- विश्रांतीनंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-२० फॉर्मेटमध्ये पुनरागमन करत आहे.
- चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून वगळण्यात आलेला मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती संघात परतला आहे.
- संघात तूफानी सलामीवीर अभिषेक शर्मा आणि युवा फलंदाज तिलक वर्मा यांचा समावेश आहे.
- चांगल्या फॉर्ममध्ये असलेले विशेषज्ज्ञ फलंदाज रिंकू सिंग आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन हे फिनिशरची भूमिका बजावतील.
- अक्षर पटेल, नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडू दोन्ही संघांमध्ये (वनडे आणि टी-२०) कायम आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ:
अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, नितीश रेड्डी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
हेही वाचा : IND vs AUS Rohit Sharma : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहीत शर्माचा विक्रम! सचिन-द्रविडशी बरोबरी












Click it and Unblock the Notifications