IND vs AUS Rohit Sharma : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहीत शर्माचा विक्रम! सचिन-द्रविडशी बरोबरी
IND vs AUS Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मैदानात उतरताच रोहितने चार भारतीय क्रिकेटपटूंसोबत हा विक्रम केला असून तो आता या यादीतील पाचवा खेळाडू बनला आहे.

विक्रमी ५०० सामन्यांचा टप्पा
२००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहित शर्मासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिलेल्या रोहितने सलामीवीर म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं करत संघातील आपले स्थान भक्कम केले. या सामन्यासह रोहितच्या नावावर आता ५०० आंतरराष्ट्रीय सामन्यांची नोंद झाली आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० सामने खेळणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
रोहित शर्माची ५०० सामन्यांची कारकीर्द
- एकदिवसीय (ODI): २७४ सामने (पर्थमधील हा सामना)
- कसोटी (Test): ६७ सामने
- टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I): १५९ सामने
५०० क्लबमधील भारतीय दिग्गज
रोहित शर्माने या विक्रमी कामगिरीसह क्रिकेटच्या इतिहासातील महान भारतीय खेळाडूंच्या पंक्तीत आपले स्थान निश्चित केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० हून अधिक सामने खेळणाऱ्या खास भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माने आता स्थान मिळवले आहे.
- सचिन तेंडुलकर: ६६४ सामने (सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम)
- विराट कोहली: ५५१ सामने (सध्या सक्रिय)
- एम.एस. धोनी: ५३८ सामने
- राहुल द्रविड: ५०९ सामने
रोहीत शर्माची निराशाजनक खेळी
- आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जरी आपला पाचशेवा सामना रोहीत शर्मा खेळत असला तरीही त्याने या सामन्यात फारशी चमक दाखवलेली नाही.
- आजच्या सामन्यात रोहीत शर्मा केवळ 8 धावा करुन बाद झाला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजीला सुरवात केली त्यावेळी संघाची अवस्था बिकट बनली असून भारतीय टीमने चार षटकातील चौथ्या बॉलवर पहिली विकेट गमावली ती रोहीत शर्माच्या रुपात..
- रोहित शर्माला जोश हेजलवुडने स्लिपमध्ये मैट रेनशॉच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. हेझलवूडचा एक छोटासा चेंडू रोहित शर्माच्या छातीवर गेला. रोहितने चेंडू स्टंपच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला पण स्लिपमध्ये तो झेलबाद झाला.












Click it and Unblock the Notifications