Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ind vs aus bgt : भारत-ऑस्ट्रेलियात सामना सुरु! सचिन तेंडूलकरचा 'हा' विक्रम विराट कोहली मोडणार

ind vs aus bgt : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना आज भारत आणि आस्ट्रोलियादरम्यान आस्टोलियात पर्थमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत. भारतीय संघासाठी ही मालिका खूप खास आहे. टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराह आहे, नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने फलंदाजी निवडली. नितीश रेड्डी यांनी पदार्पण केले आहे.

भारताने टाॅस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीला सुरुवात केली आहे. यशस्वी जयस्वाल आणि लोकेश राहुल फलंदाजी करत असून पहिल्या 2 षटकात भारताच्या बिनबाद 5 धावा झाल्या आहेत. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत या सामन्यात उपकर्णधार जसप्रीत बुमराह टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. त्यांच्यासाठीही हे मोठे आव्हान असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनुसार टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे.

ind vs aus bgt live streaming

भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी धमाका करावा लागणार आहे. विराट कोहलीला पर्थमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. जर तो आपल्या फलंदाजीने चमत्कार दाखवण्यात यशस्वी झाला तर टीम इंडियासाठी हे काम थोडे सोपे होऊ शकते. कोहलीचा अलीकडचा फॉर्म खराब आहे. इतर फलंदाजांनाही आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी लागेल.

हा पहिला विक्रम मोडू शकतो विराट

पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर विराट कोहली धावांच्या विक्रमी लक्ष्यावर आहे. तो या स्टेडियममध्ये सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज बनू शकतो पण यासाठी त्याला 60 धावा कराव्या लागतील. कोहलीच्या नावावर सध्या 140 धावा आहेत. वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रॅथवेटच्या नावावर 174 धावा आहेत. याशिवाय कोहली सचिन तेंडुलकरचा शतकांचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे आणि त्याला शतक झळकावायचे आहे.

शतक झळकावून विराट सचिनचा विक्रम मोडू शकतो

सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियात सहा शतके झळकावली आहेत. कोहलीच्या नावावरही तेवढीच शतके आहेत. शतक झळकावून तो आपला आकडा 7 वर नेऊ शकतो. सुनील गावस्कर यांनी 5 शतकी खेळी तर व्हीव्हीएस लक्ष्मणने 4 शतकी खेळी खेळली आहे.

ऑस्ट्रेलिया - (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (कीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड

इंडिया - (प्लेइंग इलेव्हन) ): केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (रक्षक), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+