IND vs AUS, 4th Test Day 5: यशस्वी जैस्वाल ऋषभ पंतवर भारताची मदार, 340 धावांचे लक्ष्य गाठणार का?
IND vs AUS, 4th Test Day 5 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 चा चौथा सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. 340 धावांचा पाठलाग करताना भारताने आतापर्यंत तीन महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या आहेत. सध्या यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत क्रीजवर आहेत.

यशस्वी जैस्वालने झुंजार अर्धशतक झळकावले. अनुभवी रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलच्या अपयशानंतर आता जैस्वाल आणि ऋषभ पंत ही जोडी भारताला वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. लंचच्या आधी कोहली स्लिपमध्ये झेलबाद झाला. त्यामुळे भारताला मोठा धक्का बसला. याआधी, रोहित शर्मा (9) आणि केएल राहुल (0) स्वस्तात बाद झाले.
हेही वाचा : Ind Vs Aus : अर्धशतक झळकावल्यानंतर नितीश रेड्डीचं पुष्पा स्टाईलमध्ये सेलिब्रेशन
पॅट कमिन्सने रोहितची विकेट घेतली आणि हा भारतीय संघासाठी आणखी एक धक्का होता. त्याच षटकात कमिन्सने पुन्हा राहुलला शून्यावर बाद केले. मिचेल स्टार्क नंतर ऑस्ट्रेलियासाठी मोठा बळी घेणारा गोलंदाज म्हणून कमिन्सचा बोलबाला होत आहे. त्याने कोहलीला 6 व्या चेंडूवर बाद केले.
हेही वाचा : IND vs AUS: विराट कोहलीच्या एका चुकीने यशस्वी जयस्वालचं शतकं हूकलं, नेमकी चूक कोणाची ?
उपाहारापर्यंत 340 धावांचा पाठलाग करताना भारताने अवघ्या 33 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. तूर्त भारताची धावसंख्या 50 षटकात 3 विकेट गमावून 104 धावा इतकी झाली आहे. जैस्वाल 61 तर पंत 22 धावांवर खेळत आहे.
हेही वाचा : IND vs AUS :युवा ऑस्ट्रेलियन फलंदाज विराट कोहलीशी भिडला! मैदानावरील जोरदार बाचाबाचीचा VIDEO व्हायरल!
हेही वाचा : PAK Vs SA 1st Test : बाबर आझमने इतिहास रचला, विराट कोहली आणि रोहित शर्माच्या रेकार्डशी बरोबरी! वाचा












Click it and Unblock the Notifications