IND vs AFG U-19: 'फायनल'प्रवेशासाठी आज टीम इंडियाचा अफगाणिस्तानशी सामना; कधी, कुठे पाहाल मॅच?
IND vs AFG U-19 Semifinal : झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबवर आज क्रिकेटच्या 'भविष्यातील ताऱ्यांचा' रणसंग्राम रंगणार आहे. एका बाजूला पाचवेळा विश्वविजेतेपद भूषवणारा आणि गतविजेता 'टीम इंडिया'चा दबदबा आहे, तर दुसऱ्या बाजूला इतिहासाची पाने उलटण्यासाठी आसुलेला जिद्दी 'अफगाणिस्तान'! आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय वाघ सलग सहाव्यांदा फायनलमध्ये धडक मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारताचा आत्मविश्वास उंचावला असला तरी, अफगाणिस्तानच्या 'सरप्राईज पॅकेज'ला कमी लेखणे टीम इंडियाला महागात पडू शकते.

अंडर-१९ विश्वचषकात भारत vs अफगाणिस्तान: हेड-टू-हेड (Head-to-Head)
अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आकडेवारी भारताचे पारडे जड असल्याचे सांगते.
- एकूण सामने: ३
- भारताचे विजय: ३
- अफगाणिस्तानचे विजय: ०
विश्वचषकात अफगाणिस्तानला अद्याप एकदाही भारताला पराभूत करता आलेले नाही. मात्र, आशिया चषकातील त्यांच्या कामगिरीमुळे भारतीय संघ सावध पवित्रा घेईल.
मैदानाची स्थिती आणि रणनीती
हरारे स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना साथ देईल. हेनिल पटेल आणि दीपेश देवेंद्रन यांच्या भेदक माऱ्यासमोर अफगाण फलंदाजांची परीक्षा असेल. जसा खेळ पुढे जाईल, तसे फिरकीपटूंचे वर्चस्व वाढेल. नॉकआउट सामन्यात धावसंख्येचा पाठलाग करणे कठीण असल्याने टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला पसंती देईल.
लाईव्ह सामना कुठे पाहाल?
टीव्ही: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network)
मोबाईल/वेब: जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲप आणि वेबसाईटवर विनामूल्य थेट प्रक्षेपण पाहता येईल.
दोन्ही संभाव्य संघ (Probable Playing XI)
भारत U-19: आयुष म्हात्रे (कर्णधार), एरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, दीपेश देवेंद्रन, हेनिल पटेल.
अफगाणिस्तान U-19: महबूब खान (कर्णधार/यष्टीरक्षक), उस्मान सादत, खालिद अहमदजई, फैसल शिनोज़ादा, उजैरुल्लाह नियाजई, अजीजुल्लाह मियाखिल, अब्दुल अजीज, रूहुल्लाह अरब, नूरिस्तानी उमरजई, वहीदुल्लाह जादरान, अकील खान.












Click it and Unblock the Notifications