India Pakistan war : मोठी बातमी IPL 2025 सामने अनिश्चित काळासाठी स्थगित! BCCI चा निर्णय
Ind Pakistan war ipl 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभुमीवर आयपीएल सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहेत. बीसीआयने हा निर्णय घेतला असून आयपीएलचे अजून सोळा सामने शिल्लक आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आणि पाकिस्तानकडून काल झालेल्या ड्रोनहल्ल्यादरम्यान, लगच पंजाब किंग्ज 11 आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातील आयपीएल सामना काल 8 मे 2025 रोजी सुरु असतानाच थांबवून रद्द करण्यात आला आहे.
काल इंडियन प्रीमियर लीगचा पंजाब आणि दिल्ली संघात सामना सुरु होता. यादरम्यान जम्मू आणि पठाणकोटच्या जवळच्या भागात हवाई हल्ल्याच्या सूचनांमुळे धर्मशाळेत उभय संघातील सामना अर्ध्यावरच रद्द करण्यात आल्यानंतर एका दिवसानंतर आता आयपीएल स्थगित करण्याचा हा निर्णय घेण्यात आला.
यादरम्यान, आता पुर्ण आयपीएल स्पर्धाच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यामुळे सध्या आयपीएलचे नियोजित सामने होणार नाहीत. सध्या या स्पर्धेतील सोळा सामने खेळणे बाकी आहे, साखळी स्पर्धेत प्रत्येक संघाला तेरा सामने खेळायचे असून बहुतांश संघांचे अकरा ते बारा सामने पुर्ण झाले आहेत. प्लेऑफमध्ये अंतीम चार संघात चुरस असताना हा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
पाकिस्तान सुपर लीग युएईला होणार
सध्या पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लिग स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धा अठरा मे पर्यंत चालणार आहे. अठरा मे रोजी या स्पर्धेचा अंतीम सामना आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभुमीवर पाकिस्ताननेही त्यांची स्पर्धा दुबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणावात तीव्र वाढ झाल्यानंतर आता दोन्ही देशातील संबंध तणावाचे आहेत या दोन्ही देशात लीग स्पर्धा सुरु होत्या. दोन्ही देशांनी या लीगसंदर्भात सुरक्षेच्या कारणावरुन ठोस निर्णय घेतले आहेत.












Click it and Unblock the Notifications