Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND Vs Ban : भारत-बांगलादेश आज सेमीफायनल मॅच! फायनलमध्ये कोण जाणार? वेळ अन् मॅच कुठे बघाल? वाचा

IND A vs BAN A Asia Cup Semi-Final : आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे! या युवा क्रिकेटपटूंच्या स्पर्धेचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सेमीफायनल सामना आज, २१ नोव्हेंबर, शुक्रवार रोजी भारत 'अ' (IND-A) आणि बांगलादेश 'अ' (BAN-A) या पारंपारिक प्रतिस्पर्धकांमध्ये रंगणार आहे.

बांगलादेशने ग्रुप स्टेजमध्ये दमदार कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले आहे, तर भारतीय संघाला मागील पराभव विसरून 'करो या मरो' च्या या लढतीत जोरदार पलटवार करावा लागणार आहे.

सामन्याचे वेळापत्रक आणि ठिकाण

  • सामना भारत 'अ' विरुद्ध बांगलादेश 'अ', सेमीफायनल १
  • स्थळ वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा (Doha)
  • वेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) दुपारी ३:०० वाजता
  • दिनांक शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५

मॅच कुठे पाहता येईल?

भारत बांगलादेश हा महत्त्वाचा सेमीफायनल सामना भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्क वाहिनीवर प्रसारित होईल. तसेच, हा सामना सोनी लिव्ह (SonyLiv) ॲपवर देखील लाईव्ह स्ट्रीम (Live Stream) पाहता येईल.

Take a Poll

खेळपट्टीची कुणाला मिळणार मदत?

  • दोहा येथील वेस्ट एंड पार्क स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांना सारखीच मदत देईल अशी अपेक्षा आहे.
  • सामन्याच्या सुरुवातीला नवीन चेंडूमुळे जलद गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते.
  • जसजशी खेळपट्टी स्थिर होईल, तसतशी ती फलंदाजीसाठी अधिक अनुकूल होईल. टी-२० फॉर्मेटमध्ये मोठा स्कोअर होण्याची शक्यता आहे.

वैभव सुर्यवंशी जबरदस्त फार्ममध्ये

या महत्त्वाच्या नॉकआउट सामन्यात काही खेळाडू निर्णायक भूमिका बजावू शकतात. वैभव सूर्यवंशी हा भारताचा सलामी फलंदाज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने तीन सामन्यांमध्ये २४२.१७ च्या स्ट्राइक रेटने २०२ धावा काढल्या आहेत आणि तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याची स्फोटक सुरुवात टीमसाठी अत्यंत महत्त्वाची असेल.

बांगलादेशचा हा गोलंदाज भेदक

बांगलादेशचा राईट-आर्म मध्यम वेगवान गोलंदाज रिपोन मोंडोल हा स्पर्धेतील सर्वाधिक ७ विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी त्याचे चार षटके निर्णायक ठरतील.

भारत-बांगलादेश आजचा सामन्यात कोण वरचढ? (Head-to-Head)

विशेष म्हणजे, टी-२० फॉर्मेटमध्ये भारत 'अ' आणि बांगलादेश 'अ' या दोन संघांमध्ये ही पहिलीच लढत असेल. त्यामुळे हेड-टू-हेड रेकॉर्ड सध्या ०-० आहे, ज्यामुळे हा सामना अधिक रोमांचक बनला आहे. मात्र भारतीय संघ अधिक बलवान दिसतो.

हेही वाचा : IND vs SA ODI Squad : आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेतून 4 भारतीय खेळाडू टीममधून बाहेर जाणार? जाणून घ्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+