Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ICC Ranking : रॅकिंगमध्ये वरुण चक्रवर्तीचा बोलबाला, एवढ्या बॉलर्सला टाकले मागे, रोहितची रॅंक घसरली

ICC Ranking Latest Update News : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आता अंतिम फेरीत पोहोचली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अपराजित राहिला आणि 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

अशातच आयसीसीच्या वतीने वनडे क्रिकेटमधील रॅंकिंग जाहीर केली आहे. यात वरुण चक्रवर्तीने धुमाकूळ घातला. त्याने तब्बल 143 बॉलर्सला मागे टाकले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी (5 मार्च) खेळाडूंची नवीनतम क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय संघाचा स्टार लेग स्पिनर वरुण चक्रवर्तीने खळबळ उडवून दिली आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अद्भुत कामगिरी केली, ज्यामुळे त्याला भरपूर फायदा झाला.

ICC Ranking

गोलंदाजांच्या क्रमवारीत, वरुणने 143 स्थानांनी झेप घेतली आणि टॉप-100 मध्ये प्रवेश केला. वरुण आता 97 व्या स्थानावर पोहोचला आहे. वरुण चक्रवर्तीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 7 विकेट घेतल्या आहेत. या 7 विकेट्सपैकी 5 विकेट्स एकाच सामन्यात घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने हे 5 विकेट्स घेतले. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने 2 विकेट्स घेतल्या.

शतकामुळे कोहलीचीही रॅंक वाढली

दुसरीकडे, शुभमन गिल फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर विराट कोहलीने एका स्थानाचा फायदा घेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय कर्णधार रोहित शर्माला दोन स्थानांनी पराभव पत्करावा लागला आहे. तो पाचव्या क्रमांकावर घसरला आहे.

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 4 सामन्यांमध्ये 72.33 च्या प्रभावी सरासरीने 217 धावा केल्या आहेत. या काळात त्याने पाकिस्तानविरुद्ध 100 धावांची नाबाद शतकी खेळीही केली.

अक्षरने 17 स्थानांनी झेप घेतली

कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म स्पर्धेत चांगला राहिलेला नाही. त्याने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 26 च्या अत्यंत खराब सरासरीने 104 धावा केल्या आहेत. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 41 धावा आहे. यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. गिल, कोहली आणि रोहित व्यतिरिक्त, श्रेयस अय्यरचाही टॉप-10 फलंदाजांच्या क्रमवारीत समावेश आहे. तो एका स्थानाने पुढे सरकला आहे. आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अक्षरलाही मोठा फायदा झाला आहे. त्याने 17 स्थानांनी झेप घेतली आहे. फिरकी अष्टपैलू अक्षर पटेल आता 13 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. टॉप-10 अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा हा एकमेव भारतीय आहे, जो 9 व्या क्रमांकावर आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+