Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

2025 मध्ये वनडे, कसोटी, T20 मध्ये 'हे' खेळाडू अव्वल! भारताच्या सर्वात लोकप्रिय खेळाडूंना यादीत स्थान

Icc player rankings 2025 rohit sharma abhishek sharma no 1 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२५ या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची अधिकृत क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय खेळाडूंचा मोठा दबदबा पाहायला मिळत असून, टी-२० आणि वनडे फॉरमॅटमध्ये भारतीय फलंदाजांनी अव्वल स्थान पटकावले आहे. युवा तुर्कांपासून ते अनुभवी खेळाडूंपर्यंत सर्वांनीच या यादीत आपली मोहोर उमटवली आहे.

Icc player rankings 2025 rohit sharma abhishek sharma no 1

टी-२० फॉरमॅट: तीन टाॅप फलंदाज

अभिषेक शर्मा 'नंबर वन'

टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय युवा खेळाडूंनी जगाला चकित केले आहे. भारताचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा ९०८ रेटिंग गुणांसह जगातील नंबर-१ फलंदाज ठरला आहे. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा फिल सॉल्ट असून, तिसऱ्या क्रमांकावर भारताचाच तिलक वर्मा विराजमान झाला आहे.

तीन टाॅप गोलंदाज

भारताच्या वरुण चक्रवर्तीने गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडचा जेकब डफी दुसऱ्या, तर अफगाणिस्तानचा रशीद खान तिसऱ्या स्थानावर आहे.

तीन टाॅप अष्टपैलू

पाकिस्तानचा सॅम अयूब पहिल्या, सिकंदर रझा (झिम्बाब्वे) दुसऱ्या आणि रोस्टन चेस (वेस्ट इंडिज) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

वनडे फॉरमॅट: तीन टाॅप फलंदाज

रोहीत शर्माचा दबदबा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांनी आपली मक्तेदारी कायम ठेवली आहे. रोहित शर्मा वनडे रँकिंगमध्ये नंबर-१ फलंदाज ठरला आहे. किंग विराट कोहली दुसऱ्या, तर न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल तिसऱ्या स्थानावर आहे.

गोलंदाजीतील टाॅप तीन खेळाडू

अफगाणिस्तानचा रशीद खान अव्वल स्थानावर असून, जोफ्रा आर्चर दुसऱ्या आणि भारताचा कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टाॅप तीन अष्टपैलू खेळाडू

अजमतुल्लाह उमरजई (अफगाणिस्तान) पहिल्या, सिकंदर रझा दुसऱ्या आणि मोहम्मद नबी तिसऱ्या स्थानावर आहेत.

कसोटी फॉरमॅट: टाॅप तीन फलंदाज

कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा जो रूट कसोटीत नंबर-१ फलंदाज ठरला आहे. हॅरी ब्रूक दुसऱ्या, तर केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टाॅप तीन कसोटी गोलंदाज

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. मिचेल स्टार्क दुसऱ्या, तर पाकिस्तानचा नोमान अली तिसऱ्या स्थानावर आहे.

कसोटीतील टाॅप तीन अष्टपैलू खेळाडू

भारताचा रवींद्र जडेजा अष्टपैलूंच्या यादीत नंबर-१ वर कायम आहे. मार्को यान्सन दुसऱ्या आणि बेन स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+