Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs NZ : टॉपला कोण राहणार, उद्या फैसला.. कसा आहे संघ? कुठे होईल सामना? किती वाजता आहे सामना? वाचा

चॅम्पियन्स ट्रॉफी- 2025 लीगचा शेवटचा सामना रविवारी खेळण्यात येणार आहे. या सामन्यात दोन वेळा चॅम्पियन टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होईल. चॅम्पियन ट्राँफीचा इतिहास पाहिला तर, न्यूझिलंडविरुद्ध खेळलेल्या एकमेव सामन्यात भारताला पराभव पहावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून बदला घेण्याची चांगली संधी आहे. हा सामना जिकून, पदतालिकेत पहिल्या स्थानावर राहण्याची भारताला संधी आहे.

India vs New Zealand

भारताला टाँपला जाण्याची संधी

चॅम्पियन ट्राँफीत दोन्ही संघ विजयाच्या रथावर स्वार आहेत. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात बांगलादेशला आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला हरवले होते. त्याच वेळी, न्यूझीलंड संघाने या दोन्ही संघांनाही पराभूत केले. न्यूझीलंड 4 गुण आणि 0.863 नेट रन रेटसह ग्रुप अ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर भारत 4 गुण आणि 0.647 नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. रविवारी होणाऱ्या रोमांचक सामन्यात, जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाणार आहे.

कसा असेल भारतीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

कसा असेल न्यूझीलंडचा संघ?

मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, ​​जेकब डफी.

सामना कुठे, किती वाजता?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा 12 वा सामना रविवारी (2 मार्च 2025) खेळला जाईल. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. त्याचा टॉस अर्धा तास आधी दुपारी 2:00 वाजता होईल.

कुठे पाहता येणार सामना?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर टीव्हीवर लाईव्ह पाहू शकता. हे हिंदी आणि इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये प्रसारित केले जात आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar अॅपवर पाहू शकता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+